Home > मॅक्स रिपोर्ट > महागाईच्या जमान्यात अनोखी शक्कल...स्वस्त दरात दिवाळीचा फराळ विक्री...!

महागाईच्या जमान्यात अनोखी शक्कल...स्वस्त दरात दिवाळीचा फराळ विक्री...!

दीपावली म्हटलं की खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असते, त्यामध्ये लाडू ,करंजी, चिवडा, चकली,बेसन बर्फी,शंकरपाळे,मोतीचुर लाडू, बर्फी, असे अनेक पदार्थ दिवाळीत आपण सर्वच घरी करत असतो आणि त्यातच दिवाळीत नवनवीन कपडे व फटाक्यांची आतिषबाजी हा सर्व आनंद आपल्या सर्वांसाठी ही दिवाळी आनंदाची आणि सुख समृद्धीची जावो हीच मनोकामना... याविषयीचा मॅक्स महाराष्ट्राचा एक स्पेशल रिपोर्ट....

महागाईच्या जमान्यात अनोखी शक्कल...स्वस्त दरात दिवाळीचा फराळ विक्री...!
X

बीड शहरातीलच आहे या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे मला माहित झालं की या ठिकाणी दिवाळीच्या फराळाचे पदार्थ विक्रीला आहेत, आम्हाला त्याची चव घेण्यासाठी सुद्धा दिलेला आहे अत्यंत उत्तम अशी चव या पदार्थाची आहे, बीड करांना एक मेजवानी म्हणून या ठिकाणी आहे सर्व पदार्थ या ठिकाणी आपल्याला मिळतील, त्यांनी प्रॉपरली जेमिनीचे तेल वापरले आहे, मी या ठिकाणी पदार्थ घेण्यासाठी आलेलो आहे, असं कार्तिक नागरगोजे म्हणाले. ग्राहक

मी दरवर्षी या ठिकाणी फराळाचं घेण्यासाठी येत आहे आणि सर्वच पदार्थ या ठिकाणी चांगले आहेत त्याची चव ही चांगली आहे, क्वालिटीचं तेल वापरलेलं आहे तुम्ही पण या आणि खरेदी करा, हे सर्व पदार्थ घरच्या सव्वी सारखेच आहेत पण घरची ती घरचंच असतं परंतु बाहेरचही खाऊ वाटतं त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी फराळाचं घेण्यासाठी आलो आहोत, असे महीला ग्राहकांचे म्हणणे आहे.

मागील वर्षी मी त्या ठिकाणी फराळाचं खरेदी करण्यासाठी येत आहे आणि इथे सर्व पदार्थ छान बनवलेले आहेत, सर्व पदार्थाची चव ही चांगली आहे आणि अतिशय कमी दरामध्ये इथे फराळ मिळत आहे, दिवाळी ही दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, आणि सर्वांनी याचा आनंद घ्यावा असं महीला ग्राहक म्हणाल्या.

ही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होताना पाहायला मिळत आहे कोरोना काळामध्ये गेली दोन वर्ष अनेक अडचणीचा लोकांना सामना करावा लागला त्यामुळे ही दिवाळी लोक आनंदाने साजरी करत आहेत आणि या निमित्त आम्ही जे पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहे ते उत्तम पदार्थ असून त्याची चवही उत्तम आहे त्याचबरोबर खिशाला परवडेल असे किमतीमध्ये हे पदार्थ आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत, बीड करांची दिवाळी ही मोठ्या उत्साहात आणि दणदणीत पार पाडावी याच्यासाठी हा उपक्रमांनी राबवला आहे.

हा उपक्रम आम्ही गेला सात ते आठ वर्षापासून बीड शहरामध्ये राबवत आहोत, ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा उपक्रम राबवत आहोत, 190 रुपयांमध्ये दिवाळीचा फराळ हा आम्ही बीड करांना देत आहोत, पंधरा हजार किलो पेक्षा जास्त माल तयार करत आहेत, आणि अत्यंत अल्प दरामध्ये हा उपक्रम आम्ही गेल्या आठ वर्षांमध्ये पासून राबवत आहोत, आणि यावर्षी सुद्धा चालू ठेवलेला आहे अत्यंत दर्जेदार तेल यामध्ये वापरलेले आहे, हे पदार्थ बनवणारे जी कर्मचारी आहेत ते बाहेर राज्यातील आहेत, बीड करांना फराळ कमी पडू नये, याच्यासाठी ते काम करत आहेत, कोरोनाच्या काळातही आम्ही हा उपक्रम चालू ठेवलेला होता, सामान्य बिडकारांसाठी व त्यांच्या खिशाला परवडेल असा उपक्रमांनी राबवत आहोत, कारण महागाई प्रचंड वाढलेली आहे, घरी करत असताना त्याच्या ध्ये प्रचंड प्रमाणात खर्च वाढत आहे, आणि हा उपक्रम आम्ही सातत्याने चालू ठेवलेला आहे, या मेहनतीमुळे नक्कीच आमच्या बीडकरांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल, असं आयोजक गौतम खटोड म्हणाले.


Updated : 28 Oct 2022 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top