Home > मॅक्स रिपोर्ट > #MaxmaharashtraImpact बीड जिल्ह्यातील रेल्वेच्या कामांना वेग...

#MaxmaharashtraImpact बीड जिल्ह्यातील रेल्वेच्या कामांना वेग...

#MaxmaharashtraImpact बीड जिल्ह्यातील रेल्वेच्या कामांना वेग...
X

बीड जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न अखेर मार्गे लागला असून राज्य सरकारच्या आयुष्याची रक्कम मिळाल्याने आता बीड करांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत मॅक्स महाराष्ट्र ने यासंदर्भात मोठा पाठपुरावा केला होता.

बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे पोहोचलीच नाही त्यामुळे रेल्वेचा प्रश्न अनेक वेळा मॅक्स महाराष्ट्रने दाखवण्याचा प्रयत्न केला होता, त्याचबरोबर राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि शिंदे- फडणवीस सरकार राज्यात आलं आणि बीडच्या रेल्वेसाठी राज्याचा हिस्सा देणार का...? जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न मार्गी लागेल का याविषयी मॅक्स महाराष्ट्रने ही बातमी दाखवली होती, त्याच बरोबर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनाही पत्रकार परिषदेमध्ये मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी बीडच्या रेल्वे विषयी प्रश्न केला होता तर त्यांनी सांगितलं की, बीड जिल्ह्यात 2024 ला रेल्वे येणार असं उत्तर त्यांनी दिलं होतं, मात्र मॅक्स महाराष्ट्र यांच्या बातमीची दखल घेत शासनाने त्यांच्या हिश्याची रक्कमेचा आदेश जारी केला आहे त्यामुळे आता बीड करांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्य होऊन 75 वा अमृत महोत्सव भारताने साजरा केला तरीही बीड जिल्ह्यात गेल्या 75 वर्षापासून रेल्वे पोहोचलीच नाही,त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न कधी पूर्ण होणार असाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला होता मात्र राज्य शासनाने त्यांच्या हिश्याची रक्कम 244 कोटी 96 लाख रुपये दिल्याचा आदेश काढला आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशीच अपेक्षा आता वाटू लागली आहे.-हे काम आम्ही 31 मार्च पर्यंत पूर्ण करू त्याचबरोबर धानोरा ते बीड पर्यंत हे काम माझ्याकडे आहे बाकी कामाचं मला सांगता येणार नाही जे रेल्वेचे पूल आहेत ते मी लवकरात लवकर पूर्ण करणार आहे त्यामुळे बीड करांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करणार आहोत. कंत्राटदार कुमार रेड्डी यांनी सांगितले.


Updated : 15 Sep 2022 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top