Home > मॅक्स रिपोर्ट > अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी महिलेचा खुन की आत्महत्या ? पोलिसांकडून तपास सुरू
अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी महिलेचा खुन की आत्महत्या ? पोलिसांकडून तपास सुरू
बीड तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या एका महिलेचा बीड परिसरातील पाली येथील तलावात मृतदेह सापडल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. सीमा सुरेश डोंगरे असे मयत महिलेचे नाव आहे. सीमा सिस्टर नावाच्या महिलेवर अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाली येथील तलावात सीमा डोंगरे या महिलेचे शव आढळले आहे. ती बीडच्या डीपीरोड भागातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी पर्यंत ती नर्सचे काम करीत होती. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या ? याचा तपास पोलिस करत आहेत.
हरीदास तावरे | 9 Jun 2022 12:57 PM IST
X
X
0
Updated : 9 Jun 2022 12:57 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire