Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : Lockdown आणि अतिवृष्टी, मराठवाड्यात ११ महिन्यांत १६३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Ground Report : Lockdown आणि अतिवृष्टी, मराठवाड्यात ११ महिन्यांत १६३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Ground Report : Lockdown आणि अतिवृष्टी, मराठवाड्यात ११ महिन्यांत १६३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
X

मराठवाड्यात पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने लाखो हेक्टर शेती उध्वस्त केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आधी लॉकडाऊन आणि नंतर अतिवृष्टी यामुळे जानेवारी ते नोव्हेंबर या काळात तब्बल १६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.


दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टीने कहर केला आणि शेतकऱ्यांच्या पिकांसह जमिनी वाहून गेल्या..शेतातील उभी पिकं नेस्तनाबूत झाल्यानं शेती उजाड झाली. तर कित्येक नद्यांसह बंधाऱ्यांनी आपला प्रवाह बदलल्याने, शेत जमीनीला नद्याचं स्वरूप आलं.. यामुळं पुढील अनेक वर्ष शेती पीकाऊ होते की नाही ? यावर देखील प्रश्नचिन्ह उभा ठाकलय. असे एक ना अनेक संकट शेतकऱ्यांपुढे उभे असताना, शासनाची शेतकऱ्यांविषयी असलेली उदासीनता आणि सरकार मधील मंत्र्यांकडून दिली जाणारी आश्वासनांची खैरात, यापुढे शेतकरी हतबल झाला आहे. याच नैराश्यातून बीड जिल्ह्यात जणूकाही शेतकऱ्यांचं आत्महत्या सत्रचं सुरू झालं की काय ? असाच प्रश्न जिल्ह्यात होत असणाऱ्या शेतकरी आत्महत्या वरून निर्माण झालं आहे..


दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टीने कहर केला आणि शेतकऱ्यांच्या पिकांसह जमिनी वाहून गेल्या..शेतातील उभी पिकं नेस्तनाबूत झाल्यानं शेती उजाड झाली. तर कित्येक नद्यांसह बंधाऱ्यांनी आपला प्रवाह बदलल्याने, शेत जमीनीला नद्याचं स्वरूप आलं.. यामुळं पुढील अनेक वर्ष शेती पीकाऊ होते की नाही ? यावर देखील प्रश्नचिन्ह उभा ठाकलय. असे एक ना अनेक संकट शेतकऱ्यांपुढे उभे असताना, शासनाची शेतकऱ्यांविषयी असलेली उदासीनता आणि सरकार मधील मंत्र्यांकडून दिली जाणारी आश्वासनांची खैरात, यापुढे शेतकरी हतबल झाला आहे. याच नैराश्यातून बीड जिल्ह्यात जणूकाही शेतकऱ्यांचं आत्महत्या सत्रचं सुरू झालं की काय ? असाच प्रश्न जिल्ह्यात होत असणाऱ्या शेतकरी आत्महत्या वरून निर्माण झालं आहे..

जानेवारी ते ऑक्टोबर म्हणजे लॉकडाऊनच्या बहुतांश काळात मराठवाड्यात तब्बल १६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये जानेवारी महिन्यात 14 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. फेब्रुवारीमध्ये 16, मार्चमध्ये 19, एप्रिलमध्ये 09, मेमध्ये 08 जूनमध्ये 18, जुलैमध्ये 11, ऑगस्टमध्ये 21, सप्टेंबरमध्ये 17, आणि ऑक्टोबरमध्ये २२ आणि नोव्हेंबरमधे ८ अशा एकूण १६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा कहर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पूजला आहे. यामुळं इथला शेतकरी एका संधीची नेहमी वाट पहात असतो. यंदा तसा योग आला अन पिकांना पूरक असा पाऊस झाला. शेती बहरली सर्व पिकं जोमात आली. मात्र ऐन हातातोंडाशी घास येताच, अस्मानी संकट कोसळलं. सर्वत्र अतिवृष्टीचा कहर झाला. कधी नव्हे तेवढा पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील सर्वच धरणं, तलाव, नद्या ओसंडून वाहिल्या, कित्येक तलाव बंधारे फुटले तर अनेक नद्यांनी पात्र बदलले. यामुळं हजारो एक्कर शेती उजाड झाली. या अतिवृष्टीत जवळपास 6 लाख 56 हजार 847 शेतकऱ्याचं 8 लाख 98 हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी बाधित झाल्याची नोंद शासनदरबारी आहे.

अतिवृष्टीबाधित शासनाने मदतही घोषित केलीय. बीड जिल्ह्यासाठी जवळपास 502 कोटींची तरतूदही झाली आहे. मात्र इथल्या शेतकऱ्यातील नैराश्य अद्यापही शासन अन इथले लोकप्रतिनिधी काढू शकले नाहीत. यामुळं दुष्काळी बीड जिल्ह्यतील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आता मृत्यूला कवटाळत आहे. जिल्ह्यात सप्टेंबर अन ऑक्टोबरच्या पावणेदोन महिन्यात, तब्बल 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर गेल्या 10 महिन्यात 155 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे. त्यामुळं तात्काळ शेतकऱ्यांना मदत देत त्यांना आधार द्यावा. अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रुमनं हातात घेऊन रस्त्यावर उतरू. असा इशारा शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिलाय.

जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यात कोणत्या महिन्यात किती आत्महत्या झाल्या?

जानेवारी - 14

फेब्रुवारी - 16

मार्च - 19

एप्रिल - 09

मे - 08

जून - 18

जुलै - 11

ऑगस्ट - 21

सप्टेंबर - 17

ऑक्टोबर - 22

नोव्हेंबर - 8

----------------------

एकूण - 163

अशा 163 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची नोंद शासन दरबारी आहे. या 163 पैकी 90 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना, शासनाची मदत मिळाली आहे. तर 16 कुटुंब अपात्र ठरले आहेत, तर उर्वरित प्रतीक्षेत आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकरी

शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन गुंड म्हणाले, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बाबतीत एक विदारक चित्र निर्माण झालेला आहे. अकरा महिन्यात 163 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर या आत्महत्येचे कारण जरी वेगळे असले तरी शेतीमध्ये शेती व्यवसाय करीत असताना शासनाची उदासीनता त्याला मालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी अगोदर सोयाबीन विकलेला आहे त्यांना भाव मिळाला नाही तर आज उसाची ही तीच परिस्थिती आहे. त्यामध्ये कायमस्वरूपी बंद असलेले ते कारखाने आहेत जे दोन तीन कारखाने आहेत. आंबेजोगाई चा कारखाना असेल वैद्यनाथ कारखाना असेल ते केजचा कारखाना असून तो सुद्धा बंद आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस उदासीन होत चाललेला आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या चे प्रमाण वाढत चालले असून आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी जनजागृती मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. शासन आपल्या दारी अशा काही योजना राबवुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्याच्यावर शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत जेणेकरून बळीराजा संकटात ला आत्महत्या करणार नाही. पीक विम्याचे पैसे असतील अतिवृष्टीचे पैसे असतील हेदेखील पैसे त्याच्या पदरामध्ये मिळालेले नाहीत. काही शेतकऱ्यांची कोरडी दिवाळी गेली. लेकर बाळांना कपडा आणता आला नाही. हे आमच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. आज लाईटचा प्रश्न असेल एम एस सी बी वाले कुठलीही नोटीस न देता पुर्व कल्पना न देता विद्युत कनेक्शन कट करत आहेत. रब्बी पीक तरी शेतकऱ्यांचा हाताला येईन हे पिक शेतकऱ्यांच्या हातुन चाललेलं आहे. त्यामुळे शासनाने हे थांबवलं पाहिजे व शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या योजना आणल्या पाहिजेत. शेतकऱ्यांचा मसनवाटा अशीच महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात म्हणावे लागेल.

दरम्यान कोरोनाच्या संकटात उसनवारी, कर्ज काढून शेतकऱ्यांनी बियाणं आणली. शेत पिकवलं, मात्र शेतातील पीक हातातोंडाशी येताच, अस्मानी संकट कोसळलं. अतिवृष्टीने शेतात होत्याचं नव्हतं केलं आणि शेतकरी पुन्हा अस्मानी संकटाच्या खाईत अडकला. यामुळे त्याच्या समोर जगावं कसं ? कुटुंबाचा गाडा चालवावा कसा ? दसरा गेला मात्र दिवाळी गेली? रब्बीच्या हंगामात पिकांची पेरणी कलीयं पण त्याला पाणी द्यायचं कसं ? अशा एक ना अनेक प्रश्नांचं काहूर, हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यात घुमतय. यामुळे या शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदती पेक्षा सरसकट योग्य अशी मदत अन त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळणं गरजेचे आहे. तेव्हाचं जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा जगेल ! अन्यथा अशाच चिता पेटल्या जातील असे कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.

Updated : 26 Nov 2021 9:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top