Home > Max Political > तुकाराम मुंढेंचा पत्ता पुन्हा कट?

तुकाराम मुंढेंचा पत्ता पुन्हा कट?

तुकाराम मुंढेंचा पत्ता पुन्हा कट?
X

राज्य सरकारने आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, या यादीत आजही तुकाराम मुंढे यांच्या नावाचा समावेश नाहीय. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मागील सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांची बढती करण्यात आली. मात्र, सरकार कोणतंही असो जनतेशी प्रामाणिक आणि नेत्यांना भ्रष्टाचार करु न देणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली कुठं करायची असा प्रश्न महाविकास आघाडीतील नेत्यांना पडल्याचं दिसून येतं.

कारण तुकाराम मुंडे सारख्या प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकाऱ्याची नागपूर मधील राजकारण्यांशी न पटल्यानं प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या मागे उभं राहू असं सांगणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंडे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला करण्यात आली होती. त्यानंतर ही बदलीही रद्द करण्यात आली. आता या बदलीला महिना होऊन गेला असला तरी अद्यापपर्यंत तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कर्तबगार अधिकाऱ्याला कोरोनाच्या काळात पोस्टिंग देण्यात आलेली नाही.

अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तुकाराम मुंडेंसारखा प्रामाणिक अधिकाऱी का नको आहे? की तुकाराम मुंडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला पोस्टिंग न देणं हे एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात षड्यंत्र आहे का? असा सवाल ही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आज झालेल्या बदल्या?

1) सी के डांगे, संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई रिक्त पदावर

2) ऐ आर काळे यांची नियुक्ती आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई या पदावर

3) डॉक्टर एम एस कळशेट्टी संचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे या पदावर

4) डॉक्टर अश्विनी जोशी यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित मुंबई या पदावर

5) श्री प्रवीण दराडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ मुंबई या पदावर

6) पल्लवी दराडे यांची नियुक्ती सहसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई अपील व सुरक्षा या रिक्त पदावर

7) जयश्री भोज यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई या पदावर

8) महेंद्रवार भुवन यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा फुले जन आरोग्य योजना मुंबई या पदावर

9) एच पी तुम्मोड यांची नियुक्ती आयुक्त दुग्धविकास मुंबई या रिक्त पदावर

10) आर बी भोसले यांची नियुक्ती जिल्हाधिकारी अहमदनगर या पदावर

11) के एच कुलकर्णी, संचालक, नगर परिषद प्रशासन, मुंबई या पदावर

Updated : 2020-10-20T18:39:59+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top