Home > Max Political > 'मोदींना सेवानिवृत्त करा, ते भारतीय लोकशाही आणि BJPसाठी धोका आहेत' - सुब्रमण्यम स्वामी

'मोदींना सेवानिवृत्त करा, ते भारतीय लोकशाही आणि BJPसाठी धोका आहेत' - सुब्रमण्यम स्वामी

मोदींना सेवानिवृत्त करा, ते भारतीय लोकशाही आणि BJPसाठी धोका आहेत - सुब्रमण्यम स्वामी
X

Senior BJP leader and former Union Minister Subramanian Swamy ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा Prime Minister Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करून म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपच्या सर्वसाधारण सभेने मोदींना सेवानिवृत्त करण्याबाबत निर्णय घ्यावा Narendra Modi retirement आणि त्यांना मार्गदर्शन मंडळात पाठवावे. मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांचे अनुयायी असल्यानं ते भारतीय लोकशाही आणि भाजपसाठी संभाव्य धोका danger to Indian democracy and the BJP असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.

स्वामी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे या पोस्टमध्ये स्वामी म्हणतात,

स्वामी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्वामी हे भाजपचे सदस्य असले तरी ते नेहमीच पक्षाच्या धोरणांवर आणि नेत्यांवर उघडपणे टीका करतात. यापूर्वीही त्यांनी मोदी सरकारच्या अनेक निर्णयांवर उघडपणे प्रश्न उपस्थित केले आहेत.

या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी स्वामी यांच्या मताशी सहमती दर्शवली, तर काहींनी त्यांना प्रत्युत्तर दिले. एका युजरने म्हटले की, "मोदी हे ट्रम्पसारखे आहेत आणि ते लोकशाहीसाठी धोका आहेत." तर दुसऱ्या युजरने स्वामी यांना प्रत्युत्तर देत म्हटले, "हे मत राजकीय कुंठेतून आले आहे. मोदी हे लोकशाहीच्या जनादेशाने निवडले गेले आहेत."

भाजप किंवा आरएसएसकडून अद्याप या वक्तव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय राजकारणातील अनेक नेत्यांच्या भूमिकांवर चर्चा सुरू झाली आहे.

Updated : 6 Jan 2026 10:54 AM IST
Next Story
Share it
Top