Home > Max Political > परमबीर सिंग यांना बडतर्फ करा:ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची मागणी

परमबीर सिंग यांना बडतर्फ करा:ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची मागणी

परमबीर सिंग यांची उचलबांगडी नंतर राज्यांमध्ये मोठे राजकीय वादळ आलं एक सनदी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे आरोप करणे आणि त्याची प्रसिद्धी मीडियावर करणे हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, हे स्पष्ट दिसत आहे. हे पोलीस खात्यातील नियमाचे उल्लंघन आहे. अशा पोलिस अधिकाऱ्याला ताबडतोब बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार यांनी केली आहे

परमबीर सिंग यांना बडतर्फ करा:ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची मागणी
X

मी स्वतः सहा महिन्यांपूर्वी परमबीर सिंगला त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची मागणी स्वतः गृहमंत्र्यांकडे केली होती . आम्ही सैनिक त्यांच्याकडे एकता कपूर बद्दल तक्रार घेऊन गेलो. कारण एकता कपूरने सैनिकांवर गलिच्छ आरोप केले.

वेबसीरीजमध्ये सैनिक सीमेवर असताना सैनिकांच्या पत्नी व्यभिचार करतात असे चित्रण केले. त्यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी आम्ही केली होती. गृहमंत्र्यांनी देखील अशाच प्रकारे परमबीर सिंह यांना सूचना दिली होती. आम्ही परमबीर सिंग यांच्याकडे गेलो असता ते म्हणाले एवढं काय सिरीयस घेता पोलिसांवर अशा प्रकारचे अनेक चित्रण होते. मी म्हटलं तुम्ही पोलिसांनी हे स्वीकारले आहे आम्ही सैनिक आहोत आम्ही कदापी हे स्वीकारणार नाही. परमबीर सिंग यांनी कुठलीही कारवाई केली नाही किंबहुना चौकशी केल्याचे नाटक देखील केले नाही. एकता कपूरला वाचवले त्या वेळी आम्ही सर्व सैनिकांनी गृहमंत्र्यांकडे मागणी केली होती या परमवीर सिंग योग्य कमिशनर नाही त्याला काढून टाका. गृह मंत्र्याच्या आदेशाचे पालन न करण्याची फॅशन झाली आहे. हा लोकशाहीचं अपमान आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर नीट विचार केला पाहिजे. उगाच राजकारणासाठी आपल्या सहकाऱ्याला बदनाम करण्याचे काम त्यांनी करू नये. त्यांच्याही बाबतीत कोणी असेच आरोप करू शकतात.

परमबीर सिंग काही धुतल्या तांदळाचा नाहीत. अशाप्रकारे गृहमंत्र्यावर शंभर कोटी मागणी केल्याचा आरोप करतात. कारण गृहमंत्र्यांनी त्यांना काढल्याचे स्पष्टीकरण दिले होते पदावरून काढल्यानंतर असे आरोप करणे निषेधार्ह आहे आणि कुठल्यातरी पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी ते केले याची आम्हाला खात्री आहे. इतर कुठल्याही राजकीय पक्षात नाही त्यामुळे राजकारणाला धरून आम्ही फक्त व करत नाही आम्ही सैनिक आहोत आणि खऱ्या ची बाजू धरण्याचे काम आम्हाला करावा लागतं. परमवीर सिंग त्याच वेळी हे उघडकीस आणून गृहमंत्र्यावर खटला भरला पाहिजे होता. स्वतः काय करायचं नाही आणि मीडियाद्वारे एका राजकीय नेत्याला बदनाम करायचं हे सरकारने कदापी सहन करू नये.

अनिल देशमुख यांना मी अनेक वर्षे ओळखतो पोलिसांच्या बदल्या मध्ये पैसे खाल्ले जातात हे जगजाहीर आहे पण मी कुठल्या चांगल्या ऑफिसरला योग्य ठिकाणी नियुक्त करण्याची मागणी केली असताना कुठलाही पैसा न घेता अनिल देशमुख यांनी नियुक्ती केलेली आहे .म्हणून अनिल देशमुख भ्रष्टाचार करत असतील असा मला बिलकुल वाटत नाही. परमवीर सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत आणि त्यांनी ते सिद्ध केले पाहिजे नाही तर त्यांच्यावर चौकशी करून त्यांना पोलिस खात्यातून बडतर्फ केले पाहिजे, अशी माझी स्पष्ट मागणी आहे.

अनिल देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात सैनिकांना प्रचंड मदत केलेली आहे सैनिकावर जिथे जिथे अत्याचार झाले तिथे तिथे त्यांनी सैनिकाची बाजू उचलून धरलेले आहे व गुन्हेगारांना कडक शासन केलेला आहे. म्हणून आम्ही सैनिक फेडरेशन तर्फे अशी मागणी करतो की गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावर कार्य करण्यास मुभा द्यावी आणि भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी.

फडवणीस यांची ईडी कडून चौकशी करण्याची मागणी ही खोडसाळ आहे. कारण केंद्रशासनाच्या यंत्रणा राजकीय दृष्ट्या वापरल्या जातात ते जगजाहीर आहे या यंत्रणा सूडबुद्धीने अनिल देशमुख वर सोडल्या तर हे घटनेला धरून नाही. मी फडणवीस आवर चौकशी करण्याची मागणी अनिल देशमुख कडे केली होती अनिल देशमुख हे म्हणाले की राजकीय सूडबुद्धीने केल्याची कारवाई दिसेल म्हणून त्यांनी ती कारवाई केली नाही. हे फडणवीस यांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि शेवटी म्हटले आहे.

Updated : 21 March 2021 4:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top