Home > Max Political > विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर…

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर…

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर, भाजपसाठी निवडणूक चुरशीची, चंद्रकांत पाटलांची पुण्यातील जागेसाठी व्युव्हरचना कामाला येणार का? फडणवीसांच्या नागपुरात काय होणार? कोणत्या मतदारसंघात होणार निवडणूक?

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर…
X

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर…विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर, भाजपसाठी निवडणूक चुरशीची, चंद्रकांत पाटलांची पुण्यातील जागेसाठी व्युव्हरचना कामाला येणार का? फडणवीसांच्या नागपुरात काय होणार? कोणत्या मतदारसंघात होणार निवडणूक? वाचा...

राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदार पदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु असताना आता कोरोनामुळे स्थगित केलेल्या विधानपरिषदेच्या 5 जागांची घोषणा करण्यात आली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणूका डिसेंबर मध्ये घेण्यात येणार आहे.

आता या 5 जागा महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळत असल्यानं भाजपसाठी ही निवडणूक कठीण जाणार आहे. या पैकी 2 जागा सध्या भाजपकडे आहेत. जर महाविकास आघाडी एकत्र या निवडणुकीला सामोरे गेली तर भाजपला या 2 जागा राखणं शक्य होईल का? असा प्रश्न आहे. या पाचही मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींची मुदत १९ जुलैला संपली होती.

मतदारसंघ...

औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघ ची जागा भाजपकडे होती. चंद्रकांत पाटील हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचे. मात्र, ते कोथरुडमधून विधानसभेवर निवडून गेल्यानं ही जागा रिक्त झाली आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादी अंतर्गत बंडखोरी झाल्यामुळे पाटील यांचा विजय झाला होता. मात्र, महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत असल्यानं ही जागा भाजपसाठी टिकवणं अवघड जाईल.

पुणे शिक्षक मतदारसंघाचे दत्तात्रय सावंत तर अमरावती शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेच्या वतीनं श्रीकांत देशपांडे हे करत आहेत. ते पुन्हा एकदा इच्छुक आहेत.

औरंगाबाद पदवीधरमधून राष्ट्रवादीचे सतिश चव्हाण, नागपूर पदवीधरमधून भाजपचे अनिल सोले हे आमदार आहेत. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भाजपला नागपूर पेक्षा पुण्याच्या जागाची चिंता निश्चितपणे सतावणार आहे.

निवडणूक कार्यक्रम:

निव़डणूकीची अधिसूचना 5 नोव्हेंबर 2020 ला जाहीर करण्यात येणार आहे.

अधिसूचना जारी झाल्यापासून ते 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत उमेदवार आपला अर्ज दाखल करु शकतील.

उमेदवारी अर्जांची छानणी 13 नोव्हेंबर पर्यत केली जाणार. तर उमेदवार आपला अर्ज 17 नोव्हेंबर पर्यंत माघारी घेऊ शकतो.

मतदानाची वेळ...

1 डिसेंबर, सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत

मतमोजणी- 3 डिसेंबर ला होईल...

Updated : 3 Nov 2020 3:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top