Home > Max Political > धनंजय मुंडेंनी केली परळीत मुस्लिम समाज बांधवांसमवेत रमजान ईद साजरी...!

धनंजय मुंडेंनी केली परळीत मुस्लिम समाज बांधवांसमवेत रमजान ईद साजरी...!

धनंजय मुंडेंनी केली परळीत मुस्लिम समाज बांधवांसमवेत रमजान ईद साजरी...!
X

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ शहरातील ईदगाह मैदानात मुस्लिम समाज बांधवांसमवेत रमजान ईद साजरी केली आहे.
धनंजय मुंडे सकाळच्या मुख्य नमाजच्या वेळी ईदगाह मैदानात दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उभारलेल्या शुभेच्छा मंडपात त्यांनी मुस्लिम समाज बांधवांना आलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
धनंजय मुंडे यांनी ईदसाठी खास पठाणी सूट, पठाणी टोपी असा विशेष पेहराव केला होता. मुस्लिम बांधवांना भेट देत असताना त्यांच्यात एक वेगळाच उत्साह दिसून येत होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, दिपकनाना देशमुख, प्रा.विनोद जगतकर, के डी उपाडे, दत्ताभाऊ सावंत, राहुल ताटे, दिलीप कराड, अतुल मुंडे, यांसह आदी उपस्थित होते.
या रमजान ईदच्या निमित्ताने समाजातील सामाजिक सलोखा व बंधुभाव कायम अबाधित रहावा, असे मत धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या घरी स्नेहभेट देऊन मुंडे यांनी शिरखुरम्याचाही आस्वाद घेतला.

Updated : 11 April 2024 11:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top