Home > Max Political > ठाकरे बंधूसह शरद पवार, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर...

ठाकरे बंधूसह शरद पवार, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर...

ठाकरे बंधूसह शरद पवार, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर...

ठाकरे बंधूसह शरद पवार, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर...
X

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devandra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat), उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व अस्लम शेख (Aslam Shaikh), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

कसा असेल बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा?

बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच पुर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याची उंची ९ फूट असेल. १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा ठेवण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १२०० किलो ब्राँझ धातूचा वापर करण्यात आला आहे.

कोणी बांधला पुतळा?

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची उभारणी प्रबोधन प्रकाशन ने केली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा तयार केला आहे

Updated : 23 Jan 2021 4:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top