Home > Max Political > BMC Election 2025 : ...तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल - राज ठाकरे

BMC Election 2025 : ...तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल - राज ठाकरे

BMC Election 2025 : ...तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल - राज ठाकरे
X

गेल्या ११ वर्षापासून हा कोकण महोत्सव साजरा होतोय. मला फक्त आपल्या सर्वांना गोष्ट सांगायची आहे." रात्र वैऱ्याची आहे... गाफील राहू नका.. आजूबाजूला लक्ष ठेवा…Mumbai मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी डाव सुरु आहेत, त्यामुळे तुम्ही सावध रहा. ज्या प्रकारचं राजकारण Politics सध्या सुरु आहे. ज्या प्रकारचा मुंबईवर डोळा ठेवून आहेत सावध राहा. सध्या मतदार याद्यांमधील Voter Lists घोळ सुरु पाहता आपल्याला आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत, कोण खोटे आहेत याकडे बारीक लक्ष ठेवा. मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची असेल. जर आपण गाफील राहिलो तर ही निवडणूक आणि Marathi People मराठी माणसाच्या हातातून मुंबई गेली समजा. आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरु होतील या लोकांचे ते मग कुणालाही आवरता येणार नाही. मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की कुठेही गाफील राहू नका. असं MNS मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील शिवडी येथील सुरू असलेल्या कोकण महोत्सवात म्हटले आहेत.


https://x.com/mnsadhikrut/status/1992627453425221896?s=४८


लवकरच Mumbai Municipal Corporation Election मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार असून प्रत्येकElection Campaignपक्ष तयारीला लागला आहे.

Updated : 24 Nov 2025 9:52 AM IST
Next Story
Share it
Top