Home > Max Political > अमृता फडणवीसांचे ट्रोल गॅंगला उत्तर, विरोधकांवर केला हल्लाबोल...

अमृता फडणवीसांचे ट्रोल गॅंगला उत्तर, विरोधकांवर केला हल्लाबोल...

अमृता फडणवीसांचे ट्रोल गॅंगला उत्तर, विरोधकांवर केला हल्लाबोल...
X

''जेव्हा एखाद्या नेत्यावर बोट उचलण्यालायक काही दिसत नाही, तेव्हा खूपदा त्यांच्या बायकोच्या मागे लागतात आणि विरोधक तेच करत आहे. त्यांनी माझ्या गाण्याला देखील सोडलं नाही. मी गायलेल्या भजनालाही ट्रोल केलं. देवेंद्र फडणीसांच्या राजकीय पदामुळे हे केलं जात आहे हे मला माहित आहे. आता मला ट्रोलिंगची सवय झाली असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झाला आहे. या गाण्याला प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. आता समाज माध्यमांवरील ट्रोल गॅंग अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहे. खरंतर अमृता फडणवीस यांना टोल केलं जाणं हे काही पहिल्यांदाच घडत नाही आहे. यापूर्वी देखील त्यांना अनेक वेळा समाज माध्यमांवर ट्रोल केले गेले आहे. आता त्यांचं प्रदर्शित झालेलं जे पंजाबी गाणं आहे त्या गाण्यावरून देखील त्यांना समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. या ट्रॉलर्सलाच त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे.

''देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आहेत त्यांच्यावर बोलण्यासाठी विरोधकांकडे काहीही नाही त्यामुळे ते माझ्यावरती टीका केली जाते असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी समाज माध्यमांवर काहीही व्यक्त केलं की त्यांना मोठ्या प्रमाणावरती टार्गेट केलं जातं. त्यांच्या पोस्ट वरती अनेक जण त्यांना ट्रोल करणाऱ्या कमेंट्स करत असतात, पण या ट्रॉलर्सची मला सवय झाली आहे मी सातत्याने माझं काम करत आहे याचा मला आनंद असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Updated : 13 Jan 2023 3:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top