Home > मॅक्स किसान > केळी निर्यातीत एकट्या महाराष्ट्राचा सर्वाधिक 60 टक्के वाटा ...

केळी निर्यातीत एकट्या महाराष्ट्राचा सर्वाधिक 60 टक्के वाटा ...

गेल्या काही वर्षांपासून भारतातून विदेशात केळीची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून ही मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षी भारतातून 2 लाख 19 हजार 737 मेट्रीक टन इतकी केळी निर्यात करण्यात आली..

केळी निर्यातीत एकट्या महाराष्ट्राचा सर्वाधिक 60 टक्के वाटा ...
X


केळी हे एक प्रमुख फळपिक मानलं जातं. केळी फळपिकात फायबर आणि खनिजांनी समृध्द असल्यान जगभरात तिला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातून विदेशात केळीची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून ही मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षी भारतातून 2 लाख 19 हजार 737 मेट्रीक टन इतकी केळी निर्यात करण्यात आली. यापैकी 50 ते 60 टक्के वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा होता. यामुळे महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना मोठी निर्यातसंधी उपलब्ध होत आहे.

केळी लागवड व उत्पादन यामध्ये भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.जगामध्ये केळी उत्पादनात, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, चीन आणि ऑस्ट्रेलिया हे देश अग्रेसर आहेत. भारतात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे केळी उत्पादक राज्य आहे. केळी हे महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे नगदी फळपिक म्हणून उदयास आले आहे. राज्यातून मागील तीन-चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात होत आहे.सध्या महाराष्ट्र राज्य देशात केळी निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

सुरवातीला देशांतर्गतच केळीला बाजार पेठ होती.खऱ्या अर्थाने केळीची निर्यात 2013-14 पासून सुरुवात झाली. 2013-24 मध्ये भारतातून 34,828 मेट्रिक टन तर महाराष्ट्रातून 5,147 मेट्रिक टन केळीची निर्यात झाली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये केळीच्या निर्यातीमध्ये दरवर्षी वाढ होत गेली. सन 2020-21 मध्ये भारतातून 2,32,518 मेट्रिक टन केळीची केळीची निर्यात झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातून 1,63,696 मेट्रिक टन निर्यात झाली. ही आजवरची सर्वाधिक केळीची निर्यात झालेली आहे. निर्यातीद्वारे 745 कोटी परकीय चलन देशाला प्राप्त झाले असून त्यामध्ये 560 कोटी महाराष्ट्राचा वाटा आहे.

देशातून केळी ची निर्यात होत होती, मात्र अल्पप्रमानात. 2013-14 पासून केळी निर्यातीला वेग यायला सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी याला शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद देत 34,828 मेट्रीक टन तर महाराष्ट्रातून 5,147 मेट्रीक टन केळी निर्यात केली. त्यानंतर यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. 2021-22 मध्ये ही आकडेवारी भारतातून 2,19,737 तर महाराष्ट्रातून 1,47,428 मेट्रिक टन पर्यत पोहोचली आहे. ही वाढती आकडेवारी जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर यांसह केळीचे उत्पादन घेणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी मोठी आशादायी आहे.

Updated : 14 April 2023 5:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top