Home > मॅक्स किसान > बीड जिल्ह्यातील आमला गावानं केलंय परिवर्तन; रेशीम उद्योगातून घेतात लाखोचं उत्पन्न...

बीड जिल्ह्यातील आमला गावानं केलंय परिवर्तन; रेशीम उद्योगातून घेतात लाखोचं उत्पन्न...

बीड जिल्ह्यातील आमला गावानं केलंय परिवर्तन; रेशीम उद्योगातून घेतात लाखोचं उत्पन्न...
X

रेशीम उत्पादन घेत असल्यामुळे आम्ही आमच्या पायावर उभे आहोत आता आम्हाला कुणाकडेही पैसे मागण्यासाठी हात पसरवायची गरज नाही...! शासकीय अधिकाऱ्यांना जसा खुर्चीवर बसून एक लाख रुपये महिना कमतात तसं मी उन्हातानात काबाडकष्ट करून महिन्याला एक लाख रुपये कमावणार....! अशी भावना आता रेशीम उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत... आमला गावातील परीवर्तनाचा हरीदास तावरेंनी केलेला ग्राऊंड रिपोर्ट..

बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळ कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ याचे दुष्काळामुळे अनेक शेतकरी घोळपळ होरपळून निघताना आपण पहात आहोत. यावर्षी तर चक्क अतिवृष्टी झाल्याने बीड जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामुळेच शेतकरी अडचणीत सापडला. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील असे काही गावे आहेत की या गावाने स्वतःची प्रगती करण्याचा विडाच उचलला आहे.





या गावांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोकरा ही योजना राबवत असताना गावातील लोकांनी एकत्र येत या योजनेच्या माध्यमातून रेशीम उद्योगाला प्राधान्य देत गावांमध्ये तब्बल दोनशे शेड उभा करून महिन्याला लाखोंचे उत्पन्न कमवत आहेत. रेशीम उद्योगाबरोबरच या रेशीम ला लागणाऱ्या पाण्यासाठी या योजनेअंतर्गत शेतातला वही केले आहेत. तसेच शेतीला पाणी कमी लागावे यासाठी या योजनेअंतर्गत ठिबक सिंचन केले आहे. तर याच योजनेअंतर्गत भाजीपाला उत्पादनासाठी शेडनेट व फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात केल्याने गावातील शेतकरी आता सदन झाल्याचं पाहायला मिळत आहे.






आपण अनेक वेळा पाहतो की एखाद्या गावातील एक शेतकरी प्रगती करता असतो. अनेक शेतकरी त्याच्याकडे पाहत असतात मात्र बीड जिल्ह्यातील आमला या गावाने मात्र एकट्या-दुकट्या शेतकऱ्यांना न प्रगती करता अख्ख्या गावाला प्रगतीपथावर नेण्यासाठी गावातील तरुण शेतकऱ्यांनी आपली कंबर कसली आहे.

मला एकूण आठ एकर जमीन आहे त्यामध्ये तीन एकर कोरडवाहू व पाच एकर बागायती आहे. त्यामध्ये गेल्या दहा-पंधरा वर्षापासून आम्ही कापूस कापूस कापूस करित वर्षी पहिल्याच हेच मिला 15 रुपये भावाने मजुराला द्यावे लागले. यावर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे कापसाचे उत्पन्न निघाले नाही दर वर्षी 40 ते 45 क्विंटल कापूस होत असतो. मात्र या वर्षी दहा ते बारा क्विंटल कापूस झाला आहे गावामध्ये एक पोखरा नावाची योजना आलेली आहे. त्या योजनेमध्ये गावातील लोकांना लोक म्हणत होते की शेड बांधा शेड बांधा गेल्या बारा महिन्यापासून शेड बांधले आहे.

यामध्ये माझा तिसरा लॉट चालू आहे. माझी परिस्थिती नव्हती मात्र मला या योजनेत काम करणाऱ्या साहेब लोकांनी मदत केली. 1-2 महिन्यांमध्ये तुम्हाला या शेडचे पैसे मिळून जातील तुम्ही अगोदर शेड उभे करा उभे केले. त्यानंतर मी रोप आणले व तिसऱ्या महिन्यांमध्येच माल कटिंग ला आला. सुरुवातीला आपण आळ्या बुक केल्या सुरुवातीला आपण 175000 आळ्या बुक केल्या. सुरुवातीला अनुभव नसल्यामुळे मला मालक कमी निघाला मात्र दुसऱ्या लॉटमध्ये चांगले पैसे राहिले त्यानंतर आता माझा तिसरा लॉट चालू आहे हा सुद्धा लॉट चांगला माल देऊन जाईल करणाऱ्यांसाठी हा धंदा चांगला आहे याच्या अगोदर आम्हाला मंजुरीसाठी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जावं लागत होतं. मात्र हे चालू केल्यापासून आमचे व्यवस्थित चाललं आहे कुणाच्या बांधावर जायची गरज नाही.





आपला धंदा आणि आपणच करणाऱ्याला खूप परवडत आहे. तिसऱ्या लोटला आपण 125000 पाळी आणली होती. त्याला आपले तीन हजार 200 रुपये खर्च झाला होता. इतर खर्च तेराशे रुपये अशी एकूण माझा साडे चार हजार रुपये पर्यंत खर्च झाला होता. त्याच्यामध्ये मला एक क्विंटल पस्तीस किलो कोसला तयार झाला होता. आपण तो बीडला मार्केटला नेला त्याला 730 रुपये भाव लागला. .त्याचे मला 80 - 85 हजार रुपये मिळाले त्याच्या मध्ये एकूण खर्च सात ते आठ हजार रुपये झाला. फक्त तेवीस दिवसांमध्ये शासनाचे पैसे मिळाले आता माझी इच्छा अशी आहे हे एक एकर तर चालूच आहे. पण अजून एकर मी तयार करणार आहे व माझी अशी एक इच्छा आहे की शासकीय अधिकारी जसे महिन्याला एक लाख रुपये महिना कमवतात, तसा मी माझ्या शेतात उन्हातानात काबाडकष्ट करून महिन्याला या रेशीम उद्योगातून एक लाख रुपये कमवायची अशी माझी इच्छा आहे, असे शेतकरी बंडू आश्रुबा उनवणे यांनी सांगितले.

मी आमच्या गावात लोकांना रेशीम उद्योगाचे शेड तयार करण्यासाठी सांगितले . लोकांनी ऐकवत गावामध्ये आता दोनशे शेड तयार केले आहेत. अजून काही लोक शेड तयार करण्यासाठी उत्सुक आहेत. माझे त्या लोकांना सहकार्य राहील, या पोखरा योजनेअंतर्गत अजून काही वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. त्याच्यामध्ये ठिबक आहे त्याला 85 टक्के अनुदान आहे. फळबाग लागवडीला 75 टक्के अनुदान आहे .तसेच शेडनेट आहे शेडनेटला भरपूर अनुदान आहे. त्यामध्ये पिकवलेला भाजीपाला बाहेर मार्केटला कोणत्याही जाऊ शकतो. त्याचबरोबर गावामध्ये शेताला झाले आहेत तसेच आमचे गाव सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी आम्ही सर्व गावकरी एकत्र आलो आहोत. माझे गाव तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात कसे पहिले येईल यासाठी आम्ही सर्व गावकरी एकत्र आलो आहोत. या योजनेचा पुरेपूर फायदा घेत आहोत... असे सरपंच परमेश्वर धायगुडे म्हणाले.





मी बाबासाहेब वरबडे मी गेल्यावर्षी माझ्या शेतात तुती लावली होती. तोपर्यंत माझे तीन लॉट भरपूर निघाले आहे. पहिल्यांदा मला भाव कमी लागला मात्र दुसऱ्यांदा मला सातशे वीस रुपये भाव लागला. याच्या मध्ये भरपूर पैसा राहिला आहे. हा तिसरा लॉट मला कमीतकमी सातशे रुपये भाव देऊन जाईल .आतापर्यंत मला चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याच्यामध्ये भरपूर फायदा आहे. कटिंग केल्यापासून दोन महिन्यांमध्येच मान तयार होत आहे. त्यांनी हा व्यवसाय करावा अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे.

शेतकर्‍यांनी आत्महत्या न करता हा व्यवसाय निवडावा व हे सर्व सुखी जीवन आहे. यामध्ये भरपूर पैसा आहे .कमी दिवसांमध्ये जास्त उत्पन्न निघत आहे. जास्त ताण घेण्याची गरज नाही 20 ते 25 दिवसांमध्येच हे उत्पन्न तयार होत आहे. बाकीच्या शेतकर्‍यांनी हा व्यवसाय करावा अशी माझी अपेक्षा आहे. मात्र आम्हाला या गावांमधून आम्ही दोन शेड उभा करत एक वेगळा आदर्श निर्माण करत आहोत आमचा हा व्यवसाय पाहून गावांमध्ये शेतकरी येतात पाहणी करतात व स्वतःचा व्यवसाय सुरू करताना पाहायला मिळत आहेत, असे बाबासाहेब वरबडे म्हणाले.

आमच्या गावांमध्ये तुतीचा प्रोजेक्ट चालू आहे. अगोदर कापूस लावत होतो मात्र पाऊस कमी जास्त होत असल्याने तो कापूस येत नव्हता. तर सोयाबीन लागवड केली तरीही ती परवडत नसायची. मात्र आम्ही गावा मध्ये आलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत मी तुतीची लागवड केली आहे. माझ्याकडे आता दोन एकर तुती आहे. दोन एकर मध्ये साधारण वर्षाला तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत आम्हाला त्याचा भरपूर फायदा मिळाला आहे. योजनेमुळे आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत. तसेच वर्षाकाठी आम्हाला तीन लाख रुपये पर्यंत टप्प्याटप्प्याने उत्पन्न मिळत आहे त्यामुळे आम्ही आता समाधानी आहोत अशी शेतकऱ्यांची सर्वसाधारण प्रतिक्रीया आहे.

Updated : 23 March 2022 1:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top