Home > मॅक्स एज्युकेशन > भारतात संशोधनाचं घोडं कुठं अडतंय?

भारतात संशोधनाचं घोडं कुठं अडतंय?

भारतात संशोधनाचं घोडं कुठं अडतंय?
X

शैक्षणिक स्तरावर केलं जाणारं संशोधन कसं मोजलं जातं? किंवा त्यापेक्षा त्याचं महत्त्व कसं ठरवलं जातं? संशोधनाचे महत्त्व ओळखण्याच्या पद्धती कोणत्या? देशातल्या शैक्षणिक स्तरांतून म्हणजे रिसर्च इंस्टीट्यूट, कॉलेज किंवा युनिर्व्हसिटीज या सगळ्या संस्थांमधून वर्षाला किती पब्लिकेशन्स होतात? किती संशोधन पेपर्स पब्लिश केले जातात? या माध्यमातून संशोधनाचे महत्त्व मोजलं जातं.भारतात किती पेटंट मिळतात?

पब्लिश झालेल्या संशोधन पेपर्स मधून किती विषयांना किंवा संशोधनाला पेटंट मिळालं आहे? पेंटंट मिळणं किती महत्त्वाचे आहे? पेटंट मिळणे म्हणजे समाजात त्या संशोधनाचा प्रत्यक्षात उपयोग होणं. त्यातून संशोधनाला किती पेटंट मिळाले आहे? त्याचा वापर किती प्रमाणात होतो हे बघितलं जातं.

मोठ्या प्रमाणात भारतातून रिसर्च पेपर्स पब्लिश होतात. पब्लिकेशनच्या अनुशंगाने भारताचा पाचवा क्रमांक लागतो. पेटंटच्या बाबतीत भारत गेल्या ८-१० वर्षात ४० व्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारतातून मोठ्याप्रमाणावर रिसर्च पेपर्स आणि पब्लिकेशन होतात. मात्र, त्या प्रमाणात संशोधनाला पेटंट मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की, संशोधन कमी दर्जाचे, कमी महत्वाचे आहे. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारण, वेगवेगळे हितसंबध इ. गोष्टी आल्यामुळे पेटंट मिळण्याचे प्रमाण कमी असू शकतं.

हे ही वाचा...

सावधान! देशाची बॅकींग व्यवस्था धोक्यात: विश्वास उटगी…

युरियाचा तुटवडा का? ‘ही’ आहेत 5 कारणं…

पालघर जिल्हा निर्मितीला ६ वर्षे, खुशी कम, जादा गम…

अमेरिकेत 4 कोटी नागरिक बेरोजगार, तर उद्योगपतींच्या उत्पन्नात अब्जो रुपयांची वाढ

भारतात प्रामुख्याने केलं जाणारं संशोधन हे Research Institute मध्ये केलं जात. मागील दहा वर्षात सर्वाधिक (२००) पेटंट हे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स बँगलोर यांना मिळालं आहे. सगळ्या आयआयटी संस्थांना मोठ्या प्रमाणात पेटंट मिळाले आहे.

एकंदरित देशातील शैक्षणिक स्तरावर किती रिसर्च इंस्टीट्यूटला पेटंट मिळाले आहे. याचा विचार करता भारतात रिसर्च इंस्टीट्यूट पैकी बेसिकली मॅकॅनिकल, केमिकल, फिजिक्स, बायोटेक, कम्युटर सायन्स आणि बेसिक सायन्सेस या क्षेत्रामध्ये सर्वाधिक रिसर्च करतात. आणि त्याच्यासाठीचेच पेटंट भारताला मिळाले आहे.

मेडिकल क्षेत्रात भारताला कमी प्रमाणात पेटंट मिळालेले आहेत? मागच्या 10 वर्षात 15 ते 20 पेटंट मिळाले असतील.

विद्यापीठ क्षेत्रावरील संशोधन...

दिल्ली विद्यापीठात मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जातं. मात्र, भारताच्या विद्यापीठ क्षेत्रावर किती संशोधन केलं जातं. याचा आपण जेव्हा विचार करतो. तेव्हा विद्यापीठ स्तरावर मोठ्या प्रमाणात रिसर्च पेपर प्रसिद्ध होतात. मात्र, त्यात पेटंट मिळत नाही. हा अभ्यासक्रमाचा एक भाग असल्यामुळं मुलं पुढे विचार करत नाही. शक्यतो विद्यापीठ स्तरावर केलं जाणार संशोधन हे पीचडी लेव्हल पर्यंतच केलं जातं. त्यामुळं भारतात मोठ्या प्रमाणात रिसर्च केलं जातात. मात्र, त्याला पेटंट मिळत नाही. असं गिऱ्हे यांनी सांगितलं.

Updated : 2 Aug 2020 12:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top