Home > मॅक्स एज्युकेशन > दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार
X

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. ठरलेल्या तारखांनुसारच दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा होती असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षेसाठी वेळ वाढवण्याचा निर्णय़

यंदा 80 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटं वाढवून देण्यात येणार आहेत.

40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वाढवून दिली जाणार


परीक्षेच्या तारखा जाहीर

दहावीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार

बारावीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार

त्याचबरबोर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरही 16 फेब्रुवारी 2021पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशीही माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सुरू करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद कऱण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाला होता. विरोधकांनीही नुकतेच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शालेय शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचाच प्रयत्न असेल असे सांगितले होते.

Updated : 20 March 2021 9:21 AM GMT
Next Story
Share it
Top