Historic Win : Press Club of Indiaच्या पहिल्या महिला अध्यक्ष संगीता बरुआ पिशारोती
X
Sangeeta Barooah Pisharoty संगीता बरुआ पिशारोती या रविवारी (१४ डिसेंबर) प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आहेत. first woman president of the Press Club of India
शनिवारी झालेल्या निवडणुकीमध्ये संगीता यांच्या टीमने सर्व पदांवर २१-० असा विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीची मतमोजणी रविवार ( १४ डिसेंबर २०२५ ) झाली. ६७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या आहेत.
कोण आहे संगीता बरुआ पिशोरोती ? Who is Sangeeta Barooah Pisharoty?
संगीता बरुआ या एक प्रसिद्ध भारतीय पत्रकार आहेत. त्या मूळच्या आसामच्या आहेत. द हिंदू या वृत्तपत्रासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं असून सध्या त्या द वायर (The Wire) या डिजिटल वृत्तसंस्थेच्या राष्ट्रीय घडामोडींच्या संपादक आहेत. पत्रकारिता क्षेत्रात एक प्रभावशाली आवाज म्हणून त्या ओळखल्या जातात. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत, ज्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. त्या केवळ पत्रकार नाहीत, तर लेखिकाही आहेत. त्यांच्या कथा आणि लघुकथा अनेक प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्रकाशित झाल्या आहेत, जसे की 'Sky Island Journal', 'Down in the Dirt', 'Indian Review', 'Storyhouse', आणि 'The Story Cabinet’. त्यांच्या लेखनातून आणि पत्रकारितेतून त्या देशाच्या विविध घडामोडींवर भाष्य करतात. 'आसाम: द एकॉर्ड, द डिसॉर्ड' (Assam: The Accord, The Discord) हे त्यांचे पहिले पुस्तक आसाम चळवळ आणि बंडखोरीच्या दस्तऐवजीकरणासाठी समीक्षकांकडून प्रशंसित झालं आहे.






