Max Maharashtraवर तुझी मुलाखत ऐकली, हेरंब कुलकर्णी यांना पन्नालाल सुराणा यांचं पत्र
हेरंब, आगे बढो, हम तुम्हारे साथ है.... पन्नालाल सुराणा यांनी लिहिलं होतं हेरंब कुलकर्णी यांना पत्र...
X
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी Pannalal Surana पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी पन्नालाल सुराणा यांनी अखेरचा श्वास घेतलाय. नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आलं होत. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पन्नालाल सुराणा यांच्या निधनाची बातमी ऐकून अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा सहवास, आठवणी, त्यांनी समाजासाठी केलेलं काम इ. आपल्या भावना शब्दांतून व्यक्त केल्या आहे.
दरम्यान लेखक हेरंब कुलकर्णी यांना पन्नालाल सुराणा यांनी पत्र लिहिलं होतं. त्यांनी ते पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
शिक्षकांसाठी साने गुरुजी हे भाषण साहित्य संमेलनात होऊ शकले नव्हते त्यासाठी Max महाराष्ट्रने हे भाषण ऑनलाईन ठेवले होते. मॅक्स महाराष्ट्रवर प्रकाशित झालेला व्हिडिओ पन्नालाल सुराणा यांनी पाहिला आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया तसेच कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी समजताच हे पत्र हेरंब कुलकर्णी यांना लिहिलं. या पत्रात ते म्हणतात,
प्रिय हेरंब,
तुझ्यावरील हल्ल्याची बातमी समजली त्यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. आज मॅक्स महाराष्ट्रवर तुझी मुलाखत ऐकली. शहारांचे वाढते बकालीकरण, तरुणांच्यात म्हणजे १२-१५ वर्षाच्या मुलांत वाढत चाललेला हेकेखोरपणा, गुन्हेगारीकरण यावर तू चांगलं भाष्य केलंस. ध्येयवादी संघटना दुबळ्या झाल्या आहेत ही आणखी चिंतेची बाब आहे. पण परिस्थिती प्रतिकूल असली तरी समाजाच्या व नव्या पिढीच्या निर्मळीकरणासाठी शक्य ते ते करत राहिले पाहिजे. हा तुझा निर्धार अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे.
मी सध्या आपले घर मध्येच असतो. प्रवास करणे वयामुळे थांबवले आहे.
हेरंब, आगे बढो, हम तुम्हारे साथ है
सस्नेही
पन्नालाल सुराणा.






