Home > Fact Check > कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मिया खलिफाला केक खाऊ घातला का?

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मिया खलिफाला केक खाऊ घातला का?

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मिया खलिफाला केक खाऊ घातला का?

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मिया खलिफाला केक खाऊ घातला का?
X


सध्या सोशल मीडियावर कॉंग्रेस कार्यकर्ते अडल्ट फिल्म एक्टर मिया खलीफा ( Former Porn Star Mia khalifa) हिच्या पोस्टरला केक खाऊ घालत असल्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

पॉर्न स्टार मिया खलिफा हिने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केलं होतं. त्यानंतर तिला भारतातील उजव्या विचारसरणीच्या लोकांनी ट्रोल केलं आहे. तरीही तिने आपण शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. (Former Porn Star Mia khalifa on Indian Farmer Protest )

भाजप सदस्य सुरेंद्र पुनिया यांनी एक ट्विट केलं असून ज्यामध्ये कॉंग्रेस ची थट्टा उडवली आहे.

मूळ पोस्ट

"राहुल जी के कांग्रेसी! फिर कहते हैं EVM हैक हो गई."

या ट्विटला 2,100 पेक्षा अधिक रिट्वीट मिळाले आहेत. नंतर हे ट्विट डिलीट केलं आहे.आणखी एक भाजप सदस्य राज आनंद सिंह यांनी अपमानजनक शब्द वापरुन ट्विट केलं आहे.

"इन चमचों को विदेशी नाचने और अंग प्रदर्शन करने वाली ही क्यू पसंद आता है. देशी @ReallySwara को कोई पूछ ही नहीं रहा इस बार और @khanumarfa खैर छोड़ों.

Alt News ने दिलेल्या वृत्तात हा फोटो Edit केलेले असल्याचं म्हटलं आहे. रिव्हर्स इमेज या टूल च्या साहाय्याने सर्च केलं असता हा फोटो कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कॉंग्रेस चे कार्यकर्ते केक खाऊ घालत असल्याचा आहे. हा फोटो 19 जून, 2007 चा असून राहुल गांधी यांच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केक कापल्यानंतर काढलेला आहे. या फोटोत कार्यकर्ते राहुल गांधींना केक भरवत आहेत.

गेटी इमेजस वर हा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल.


एकंदरित पोर्न स्टार मिया खलिफा चा कॉंग्रेस कार्यकर्ते केक खाऊ घालत असल्याचा फोटो इडिट केलेला आहे.

Updated : 2021-02-08T19:19:45+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top