Home > Fact Check > Fact Check : भारतीय वायूसेनेच्या पायलटला पकडलं, पाकिस्तानच्या पॅराग्लायडरचा जुना व्हिडिओ व्हायरल

Fact Check : भारतीय वायूसेनेच्या पायलटला पकडलं, पाकिस्तानच्या पॅराग्लायडरचा जुना व्हिडिओ व्हायरल

Fact Check : भारतीय वायूसेनेच्या पायलटला पकडलं, पाकिस्तानच्या पॅराग्लायडरचा जुना व्हिडिओ व्हायरल
X

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळं उध्वस्त केली. त्यानंतर भारत-पाकिस्तानध्ये तणाव वाढला. कित्येक पाकिस्तानी प्रॉपगेंडा पसरविणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंट्स वरुन भारतीय सैन्य दलाबाबत अफवा पसरविल्या गेल्या. अशा फेक बातम्यांचं ऑल्ट न्यूजनं सातत्यानं फॅक्ट चेक केलं.

सोशल मीडियावर असा दावा करत एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक व्यक्ती पॅराग्लायडिंग करतांना एका शेतात उतरत असल्याचं दिसतंय. त्यानंतर काही लोकं त्या व्यक्तीच्या दिशेनं पळतांना दिसतात...हा व्हिडिओ शेअर करत दावा कऱण्यात आलाय की, हा व्हिडिओ भारतीय वायुसेनेची महिला पायलट स्क्वाड्रन लीडर शिवांगी सिंह यांचा असून लढाऊ विमान राफेल पाकिस्तानच्या सीमेत पडल्यानंतर शिवानी यांना पाकिस्तानी सैन्यानं अटक केल्याचा दावा करण्यात आला होता.

पाकिस्तानी युजर सय्यद महम्मद हसन याने व्हायरल व्हिडिओ शेअकर करत लिहिलंय की, की राफेल विमान पडल्यानंतर भारतीय वायुसेनेच्या पायलट शिवानी सिंह यांना अटक कऱण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

अशाच प्रकारे मियाँ इऱफान अब्बास नावाच्या दुसऱ्या एका युजरनंही हाच व्हिडिओ शेअर करत लिहिलंय की, भारताचं लढाऊ विमान राफेल पाडण्यात आलं असून महिला पायलट ला पाकिस्तानमध्ये पकडण्यात आलंय...

याच प्रकारे अनेक पाकिस्तानी युजर्स ने हा व्हिडिओ याच दाव्यासह इंस्टाग्राम वरही पोस्ट केलाय.

फॅक्ट चेक

ऑल्ट न्यूजनं या व्हिडिओचं सत्य जाणून घेण्यासाठी पडताळणी केली...या व्हिडिओशी संबंधित की-वर्ड्स सर्च केल्यानंतर हा व्हिडिओ शरजील खटक नावाच्या युट्युब चॅनेलवर २३ मार्च २०२५ रोजी अपलोड झाल्याचं दिसलं. त्यामुळं हा व्हिडिओ भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या आधीचा आहे, हे स्पष्ट झालं. व्हिडिओ च्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय की, या व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या व्यक्तीनं पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतातील लारम टॉप इथून उडान भरली होती आणि याच प्रांतातील लॉवर दीर क्षेत्रातल्या चकदरा इथं लँडिंग केलं होतं. त्यानंतर ऑल्ट न्यूजनं या युट्युब चॅनेलची पाहणी केली. या पाहणीत पॅराग्लायडिंगशी संबंधित भरपूर व्हिडिओ दिसले. विशेष म्हणजे, शरजील खटक हा एक पाकिस्तानी पॅराग्लाइडर असून जो या चॅनेलवर नियमितपणे आपले व्हिडिओ अपलोड करत असतो.

शरजील खटक च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर १० मे २०२५ रोजी एक व्हिडिओ अपलोड केला. यामध्ये त्यानं व्हायरल होत असलेल्या दाव्याचं खंडन केलं. हा व्हिडिओ कुठल्याही भारतीय पायलट ला अटक केल्याचा नसून तो स्वतःचाच असल्याचं स्पष्ट केलं.


याच व्हायरल व्हिडिओचा दुसरा अँगलही यावेळी पडताळणीत समोर आला...जो शरजील खटक ने पॅराग्लायडिंग करतांना आपल्या हॅल्मेटच्या एक्शन कॅमेरात शूट केला होता. हा व्हिडिओ शेरजील ने १८ एप्रिल २०२५ रोजी इंस्टाग्रामवर अपलोड केला होता...याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की,” लॉवर दीर के एक गांव की सडक पर मेरी लँडिंग”

कुठल्या भारतीय पायलटला पकडण्यात आलं का ?

एका पत्रकार परिषदेत पाकिस्तानी सैन्याचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला की, कुठला भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात आहे का ? यावर शरीफ यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्या ताब्यात असा कुठलाही पायलट नाहीये...सोशल मीडियावर शेअर होणारी माहिती अफवा असून या बातमीत तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं...

भारत सरकारची फॅक्ट चेकिंग विंग असलेल्या पीआयबीनं देखील या दाव्याचं खंडन केलं...कुठल्याही भारतीय महिला पायलटला पाकिस्तानी सैन्यानं पकडलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

एकूणच काय तर कित्येक पाकिस्तानी सोशल मीडिया युजर्सनं पाकिस्तानी पॅराग्लाइडर शरजील खटक याचा जुना व्हिडिओ शेअर करत खोटा दावा केला की, भारतीय वायुसेनेच्या महिला पायलट स्क्वाड्रन लीडल शिवांगी सिंह यांना राफेल या लढाऊ विमानाचं क्रॅश झाल्यानंतर पाकिस्तानच्या सीमेतून पाकिस्तानच्या सैन्यानं अटक केली...

https://www.altnews.in/hindi/old-video-pf-pakistani-paraglider-shared-with-false-claim-of-indian-air-force-pilot-got-captured/

Updated : 13 May 2025 9:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top