Home > Fact Check > Fact Check 2 ‘ऑपरेशन सिंदूर’ : पाकिस्तानचं जेट विमान पाडल्याचा दावा करणारी ती क्लिप व्हिडिओ गेमची

Fact Check 2 ‘ऑपरेशन सिंदूर’ : पाकिस्तानचं जेट विमान पाडल्याचा दावा करणारी ती क्लिप व्हिडिओ गेमची

Fact Check 2 ‘ऑपरेशन सिंदूर’ : पाकिस्तानचं जेट विमान पाडल्याचा दावा करणारी ती क्लिप व्हिडिओ गेमची
X

दहशतवाद्यांनी पहलगाम इथं पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नं पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळं नेस्तनाबूत केली. या दरम्यान, नेटिझन्सनी सोशल मीडियावर ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या अनुषंगानं फोटो, व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली.

अशाच प्रकारे २ व्हिडिओ शेअर केले जात आहेत, त्यात भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला जातोय. या व्हिडिओमध्ये रोबोटिक डिवाइस दिसत आहे, हे रोबोटक यंत्र आकाशात उडणाऱ्या लढाऊ जेट विमानाला लक्ष्य करुन त्यादिशेनं फायरिंग करत असल्याचं दिसतं.

पहिला व्हिडिओ

या व्हिडिओवर “भारतीय रडार की ओर से ऑटोमेटिक अटैक 06/05/2025 रात के 2 बजे” असा इम्पोज टेक्स्ट लिहिण्यात आलाय.

उजव्या विचारसरणीच्या दीपक शर्मा नावाच्या एका नेटिझन्सनही असाच दावा करत हाच व्हिडिओ पोस्ट केलाय. ऑल्ट न्यूजनं या फॅक्ट चेकचा आर्टिकल लिहेपर्यंत या व्हिडिओला ८ लाख ६३ हजार व्ह्यूज मिळाले होते.


अशाच पद्धतीनं X युजर ‘DreamThatWork’ या अकाऊंटवरुनही हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओलाही ऑल्ट न्यूजनं यावर आर्टिकल लिहेपर्यंत १२ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते.

आणखी एका नेटिझन्सनं याच दाव्यानं हा व्हिडिओ पोस्ट केलाय

काही अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्ससोबतच कित्येक यूजर्सनी याच दाव्यासह व्हिडिओ पोस्ट केलाय.



दुसरा व्हिडिओ

हवाई हल्ल्याचा आणखी एक असाच व्हिडिओ ‘पाकिस्तानी फाइटर जेट जहाज मार गिराने का फूटेज’ असल्याचा दावा करत शेअर करण्यात आलाय. उजव्या विचारसरणीच्या नेटिझन असलेल्या ‘नेहरा जी’ या अकाऊंटवरुन याच दाव्यानं व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. ऑल्ट न्यूजनं यावरचं फॅक्ट चेक आर्टिकल लिहेपर्यंत या व्हिडिओला ६ लाख २५ हजार पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते.

पत्रकार मनीष मिश्रा यांनीही याच दाव्यासह ही व्हिडिओ क्लिप स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होती

याशिवाय इतरही सोशल मीडिया अकाऊंट्सवर याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.

फॅक्ट चेक

ऑल्ट न्यूजनं या दोन्ह व्हिडिओची पडताळणी केली. यात हे दोन्ही व्हिडिओ ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित नसल्याचं समोर आलंय. हे दोन्ही व्हिडिओ ६-७ मे रोजी भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या काही महिन्यांआधीपासूनच इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

पहिला व्हिडिओ

ऑल्ट न्यूजनं यापैकी पहिल्या कथित व्हिडिओची तपासणी केली. हा व्हिडिओ ३० मार्च २०२५ रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओसंदर्भात अन्य कुठलीही माहिती सांगण्यात आली नाही. मात्र, यातून हेच स्पष्ट होतं की, हा व्हिडिओ ‘ऑपरेशन सिंदूर’ शी संबंधित नाही.


पडताळणीमध्ये ऑल्ट न्यूजला आढळलं की, अशाप्रकारचे बहुतांश व्हिडिओ हे गेमिंगशी संबंधित आहेत. युट्युब चॅनेल ‘Compared Comparison’ वर अशाप्रकारचे गेमिंग व्हिडिओ उपलब्ध आहेत

याच चॅनेलच्या अबाऊट मध्ये हा चॅनेल ArmA3 आणि DCS (हे दोन्ही सैन्य सिमुलेशन गेम आहेत) च्या मदतीनं सैन्याशी संबंधित कंटेंटची निर्मिती करतात. याच युट्युब चॅनेलवर ऑल्ट न्यूजला अशाच प्रकारचे डिवाइस असणारे अन्य व्हिडिओही दिसले. याच व्हिडिओमध्ये १५ सेकंदानंतर याच डिवाइसच्या सहाय्यानं आकाशात रडारवर शूटिंग करत असल्याचे व्हिज्युअल्स आहेत.

दुसरा व्हिडिओ

दुसरा व्हिडिओ हा १९ एप्रिल २०२५ रोजी पोस्ट करण्यात आल्याचं ऑल्ट न्यूजच्या पडताळणीमध्ये समोर आलं. हा व्हिडिओ एका गेमिंग क्रिएटरनं पोस्ट केला होता. त्यामुळं दुसरा व्हिडिओ देखील ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या आधीचा असल्याचं स्पष्ट होतंय.

शेवटी, पाकिस्तानच्या लढाऊ जेट विमानाला पाडल्याच्या दाव्यासह शेअर केले जाणारे दोन्ही व्हिडिओ हे प्रत्यक्षात ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या आधीचे आहेत.



Updated : 9 May 2025 6:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top