Home > Fact Check > Fact Check: कोरोनाग्रस्त आशिष शेलारांना खरंच रेमडीसीवर मिळालं नाही का? प्रसाद लाड यांचा दावा खरा की खोटा?

Fact Check: कोरोनाग्रस्त आशिष शेलारांना खरंच रेमडीसीवर मिळालं नाही का? प्रसाद लाड यांचा दावा खरा की खोटा?

Fact Check: कोरोनाग्रस्त आशिष शेलारांना खरंच रेमडीसीवर मिळालं नाही का? प्रसाद लाड यांचा दावा खरा की खोटा?
X


आज राज्यातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीबाबत आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यात रेमडीसीवरचा तुटवडा असून… 

आमचे नेते आशिष शेलार हे रुग्णालयात आहेत. त्यांना आम्हाला रेमडिसीवर इंजेक्शनची उपलब्धता करून द्यायची आहे. पण लिलावती रुग्णालयात देखील रेमडिसिवर इंजेक्शनची उपलब्धता नाहीये.

असं म्हणत आमदार आशिष शेलार यांना रेमडीसीवरची गरज असूनही रेमडीसीवर मिळत नसल्याचा दावा केला होता.

यावर आम्ही कोरोनाग्रस्त आमदार आशिष शेलार यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी प्रसाद लाड यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचं सांगत… त्यांना Tocilizumab इंजेक्शन मिळत नसल्याचं त्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं आहे.


दरम्यान राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. राज्य सरकारने रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होऊ नये. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना रेमडेसिवरचे सर्व अधिकार दिले आहेत. तरीही राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

 राज्यात आजही रेमडेसिवीरचा काळाबाजार होत आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या आमदार आशिष शेलार यांना रेमडेसिवीर मिळत नसल्याचं दावा आमदार प्रसाद लाड यांनी केला होता.


काय म्हटलंय होतं प्रसाद लाड यांनी…

राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा लक्षात घेता भाजप नेत्यांनी विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा केला. त्यामघ्ये दमणला मधील एका कंपनीने भाजपच्या नेत्यांना ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, या कंपनीला राज्य सरकारने पत्र न दिल्यानं अद्यापर्यंत रेमडेसिवीर मिळाले नाहीत. असा दावा लाड यांनी केला आहे.

रेमडीसीवर इंजेक्शनचा काळा बाजार करू नये. अशी मागणी केली आहे. प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी एक पत्र सर्व आमदारांना पाठवलं होतं. ज्यामध्ये रेमडिसिवर इंजेक्शनचा साठा कोणत्या कोणत्या सेंटरवर (स्टॉक) उपलब्ध आहे. या बद्दल माहिती दिली होती. पण कोणत्याही सेंटर ला फोन केला असता, साठा नसल्याचं सांगितलं जातं.

आमचे नेते आशिष शेलार हे रुग्णालयात आहेत. त्यांना आम्हाला रेमडिसीवर इंजेक्शनची उपलब्धता करून द्यायची आहे. पण लिलावती रुग्णालयात देखील रेमडिसिवर इंजेक्शनची उपलब्धता नाहीये.

असं म्हणत आमदार आशिष शेलार यांना रेमडीसीवरची गरज असूनही रेमडीसीवर मिळत नसल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं. मात्र, मॅक्समहाराष्ट्रने आशिष शेलार यांना कॉल केला तेव्हा त्यांनी प्रसाद लाड यांनी चुकीची माहिती दिल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे.

Updated : 16 April 2021 5:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top