Home > Video > 'इतना अंधेरा कभी न था' पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचं भाष्य

'इतना अंधेरा कभी न था' पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचं भाष्य

चांगला पत्रकार म्हणजे काय? आजचा पत्रकार आणि पत्रकारितेवर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचं भाष्य...

इतना अंधेरा कभी न था पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचं भाष्य
X

Marathi Patrakar Din आज ६ जानेवारी म्हणजे मराठी पत्रकार दिन... सध्याच्या माध्यम क्षेत्रातील सद्यस्थितीवर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे म्हणतात की, आजची पत्रकारिता ही खरी (मल्टीमीडिया) नसून समाज आणि लोकांचे शोषण करणारी व्यवस्था बनली आहे. यामुळे बातम्या या घोड्याच्या शर्यतीसारख्या धावतात, आजच्या पत्रकाराला एखाद्या मुद्द्यावर थांबून अभ्यास करण्यास वेळच मिळत नाही. एकट्या पत्रकावर किती जबाबदाऱ्या? सकाळी स्मशानात जाऊन बातमी आणायची आणि संध्याकाळी क्रिकेट सामन्याचे कव्हरेज करायची अशी अनेक असाइनमेंट्स दिली जातात. आणि अशा परिस्थितीत आपण समाज बदलण्याचे स्वप्न पाहतो कसं शक्य आहे. असा सवाल ते उपस्थित करतात.

चांगला पत्रकार म्हणजे कोण? बातम्यांच्या मागे धावणारा की बातम्यांनी त्याच्या मागे धावावे? काय लिहावं हे सुचत नाही आजच्या पत्रकारांना? आयडिया येत नाही? अशावेळी जावेद अख्तर यांच्या कवितेच्या ओळींचा उल्लेख उत्तम कांबळे करतात की, इतना अंधेरा कभी न था हे लिहा.. कारण आज इतका अंधार कधीच नव्हता. असं ज्येष्ठ पत्रकार सद्याच्या पत्रकारितेवर भाष्य करतात... नेमकं काय म्हटलं पाहा...

https://youtube.com/shorts/v5JFQQGFiHc?si=wTAXRTnzrO2rXybz

Updated : 6 Jan 2026 3:17 PM IST
Next Story
Share it
Top