Home > Politics > किरीट सोमय्या औरंगाबादच्या 'या' मंत्र्यांचा आज घोटाळा बाहेर काढणार

किरीट सोमय्या औरंगाबादच्या 'या' मंत्र्यांचा आज घोटाळा बाहेर काढणार

किरीट सोमय्या औरंगाबादच्या या मंत्र्यांचा आज  घोटाळा बाहेर काढणार
X

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. तर आज औरंगाबाद मधील एका मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या किरीट सोमय्या यांनी एसटी कर्मचार्‍यांची भेट घेतली. यावेळी बोलताना आज औरंगाबादच्या एका मंत्र्याच्या घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सोमय्या म्हणाले.तर काही वेळात सोमय्या यांची पत्रकार परिषद असून, त्यात ते कुणाची फाईल उघडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Updated : 19 Nov 2021 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top