Home > Politics > गिरीश महाजन-एकनाथ खडसे दोघे एकमेकांना 'तू..तू..मै..मै'

गिरीश महाजन-एकनाथ खडसे दोघे एकमेकांना 'तू..तू..मै..मै'

एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात चांगलीच तू-तू, मैं-मैं रंगल्याचं पहायला मिळालं.

गिरीश महाजन-एकनाथ खडसे दोघे एकमेकांना तू..तू..मै..मै
X

औषधी साठी जिल्हा नियोजन मधून निधी खर्च करू नये असा प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केल्यावर मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली या विषयावरून सभागृहात वातावरण चांगल तापल होत.

शिंदे-फडणवीस सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली जळगाव जिल्हा नियोजन समितीचे आज पहिली बैठक पार पडली . या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे सह सर्व पक्षांचे आमदार खासदार अधिकारी उपस्थित होते. नेहमीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणाऱ्या या तिघाही नेत्यांच्या बैठकीला असलेला उपस्थितीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेलं होतं.

सभागृहात अधिकाऱ्यांनी औषधीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी खर्च करण्याबाबतचा प्रश्न मांडला. यावर एकनाथ खडसेनी जिल्हा नियोजन समितीतून औषधींसाठी निधी खर्च करण्याची गरजच काय ? वैद्यकीय शिक्षण विभागातून औषधींसाठी निधी का वापरले नाहीत , या औषधींचा खर्च हा करू नका? औषधींसाठीचा हा निधी कोरोना काळातील आहेत का ? असे एक ना अनेक सवाल उपस्थित करत एकनाथ खडसेंनी सभागृहातील अधिकाऱ्यांना तसेच मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष केलं.

याच मुद्द्यावरून गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यात तू तू-मैं मैं पाहायला मिळाली. तुमच्या कुठे घरातून कुठे पैसे जात आहेत , सरकारचा पैसा आहे गरिबांसाठी आहे, राज्यात जळगाव जिल्हयाला मेडिकल हब केले , अनेक योजना येणार आहे तुम्ही पाहत रहा.असे म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

अखेर गिरीश महाजन यांनी अशा पद्धतीने औषधे साठी पैसे खर्च करतात अशी माहिती दिली. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही या प्रकरणात मध्यस्थी करत या विषयात मार्ग काढण्यात येईल असे सांगितले नंतर हा विषयावर पडदा पडला.

Updated : 21 Nov 2022 3:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top