Home > Politics > देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे मुंडे भगिनींची पाठ, राजकीय चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे मुंडे भगिनींची पाठ, राजकीय चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे मुंडे भगिनींची पाठ, राजकीय चर्चांना उधाण
X

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी कुठलीही नाराजी नसल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये असताना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची अनुपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

2019 च्या विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्यापासून पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. मात्र त्यानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी करत नाराजी नसल्याचे सांगितले होते. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बीडमध्ये असताना या कार्यक्रमाकडे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पाठ फिरवली.

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. स्व.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान आणि शिवसंग्राम संघटनेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हजर आहे. पण, बीडमध्ये कार्यक्रम असून खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे या गैरहजर होत्या.

भाजप पक्ष श्रेष्ठीचे नेते उपस्थित असताना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या न आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना संधी न दिल्यामुळे पंकजा मुंडे कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट सुद्धा घेतली होती. त्यानंतर पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. त्यानंतर बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना मुंडेंनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.

Updated : 31 Dec 2022 9:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top