- ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...
- नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी
- पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या;मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा
- राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती होणार :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत
- मुंबईतील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली
- कुर्ला इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, बचाव कार्य सुरूच
- राजकीय सत्तानाट्यात दिवसभरात काय घडले?
- Alt news चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांना अटक
- सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्या, गूढ उलगडलं

रमाईच्या भूमिकेने बाबासाहेब उमगले: सोनाली कुलकर्णी
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मॅक्समहाराष्ट्र वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत आहे. देशात आणि जगात नावलौकिक मिळवणाऱ्या अनेक व्यक्तींच्या जीवनातील यशामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा आहे. याच विचारांचा वसा घेऊन चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याशी आम्ही बातचीत केली. त्या म्हणतात… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीलाच नव्हे तर त्यांच्या विचारधारेला माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे . मी डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. आंबेडकर या चित्रपटात रमा आंबेडकरांची भूमिका साकारली होती. माझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मला हा सिनेमा मिळाला होता. ज्यामुळे माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विस्तारला. मी आज अभिमानाने सांगू शकते की 'मानवता' सोडून कुठल्याही धर्मावर विश्वास नाही. आणि त्याच संपूर्ण श्रेय डॉ. आंबेडकर आणि त्यांचे कुटूंब ज्यांनी अनेक कष्ठांना यातनांना सामोरे गेले आहेत. त्याला समर्पित आहे. नव्या पिढीला आपल्या समाजाची ओळख करुन देण्याचा व्रत आणि ध्येय डॉ. जब्बार पटेल यांनी हाती घेतलं आहे. असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितलं.