Home > Economy > काय आहे लिबोर स्कॅम?

काय आहे लिबोर स्कॅम?

काय आहे जगाच्या अर्थकारणावर प्रभाव पाडणारा लिबोर स्कॅम, या स्कॅमचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला? वाचा अर्थतज्ञ संजीव चांदोरकर यांचं विश्लेषण

काय आहे लिबोर स्कॅम?
X


आंतरराष्ट्रीय बँकिंग, वित्तक्षेत्राची जुजबी माहिती असणाऱ्यांना "लंडन इंटरबॅन्क ऑफर रेट" (लीबॉर ) चे माहात्म्य माहित असेल. डिसेंबर २०२१ पासून लिबोरला सक्तीने "निवृत्त" केले जाणार आहे. अनेक कारणे झाली. पण २०१२ मध्ये लिबोर घोटाळा (स्कॅम) बाहेर आला.

लिबोर व्याजदर संबंधित बँका अनेक वर्षे संगनमताने "फिक्स" करत होत्या. त्यात ड्युयशे, बार्कलेज, बँक ऑफ अमेरिका, जे पी मॉर्गन, सिटीग्रुप, यूबीएस अशा बड्या बँका सामील होत्या. बँकिंग / वित्तक्षेत्र म्हणजे जागतिक अर्थव्यस्वस्थेचे पुरोहित वर्ग आहेत; प्रचंड दबदबा करून ठेवला आहे.

आतमध्ये प्रचंड धांदली सुरु असते. ती कधीतरी स्कॅमच्या रूपाने बाहेर येते.

लिबोरच्या जागी दुसरे रेफरन्स व्याजदर येत आहेत उदा. ब्रिटन "स्टर्लिंग ओव्हरनाईट इंडेक्स ऍव्हरेज (सोनिआ)" आणि अमेरिका डॉलरसाठी "सिक्युअर्ड ओव्हरनाईट फायनान्स रेट (एसओएफर)" संदर्भ व्याजदर बनवत आहे.

युरोपियन संघ, स्विझर्लंड, जपान देखील आपापले संदर्भ व्याजदर ठरवणार आहे.

भारत आंतरराष्ट्रीय कर्ज बाजारातून मोठ्याप्रमाणावर कर्जे उचलू लागला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या घटना जागतिक अर्थव्यवस्थेत घडत आहेत.

जाणून घयायला बरेच काही आहे; ज्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळते.

Updated : 17 Nov 2020 2:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top