Home > Business > तेलाच्या बदल्यात पिस्ते, गव्हाच्या बदल्यात कार, 'बार्टर ट्रेड' परत आला !

तेलाच्या बदल्यात पिस्ते, गव्हाच्या बदल्यात कार, 'बार्टर ट्रेड' परत आला !

तेलाच्या बदल्यात पिस्ते, गव्हाच्या बदल्यात कार, बार्टर ट्रेड परत आला !
X

रशिया-युक्रेन संघर्षानंतर जागतिक व्यापारात मोठे बदल झाले आहेत. अमेरिकेने, युरोपियन युनियनने (EU) आणि इतर मित्रदेशांनी लादलेल्या कडक निर्बंधांमुळे रशियाला पुन्हा ‘बार्टर ट्रेड’ म्हणजे वस्तुविनिमय प्रणालीकडे वळावे लागले आहे.

आज चीन, पाकिस्तान आणि इराणसारखे अनेक आशियाई आणि मध्यपूर्वेतील देशही चलनावर आधारित व्यवहारांऐवजी वस्तूंच्या देवाणघेवाणीकडे वळत आहेत — म्हणजेच चलनविरहित व्यापार पुन्हा सक्रिय झाला आहे.

बार्टर ट्रेड म्हणजे काय ?

बार्टर ट्रेड म्हणजे पैशाऐवजी वस्तू किंवा सेवा थेट वस्तू किंवा सेवेच्या बदल्यात देवाणघेवाण करणे.

उदा. शेतकरी गहू देऊन कुंभाराकडून भांडे घेणे किंवा सुताराकडून खुर्च्या घेऊन शिंपीने कपडे देणे. मात्र, जागतिक बाजारातील किंमतींचे चढउतार आणि मागणीतील फरकामुळे ही प्रणाली आधुनिक व्यापारातून हळूहळू गायब झाली होती. पण रशियावरील निर्बंधांमुळे हा पद्धत पुन्हा जिवंत झाली आहे.

रशियाचं बार्टर व्यवहारात पुनरागमन

रॉयटर्सच्या अहवालानुसार, रशियाने चीनसोबत अनेक बार्टर डील्स केली आहेत. यातील काही प्रमुख डिल्स खालील प्रमाणे आहेत.

गाड्या आणि गहू: चीनी कंपन्यांनी गाड्या विकत घेतल्या, रशियाने रुबलमध्ये गहू विकत घेतला आणि दोघांनी वस्तूंची अदलाबदल केली.

जवस बियाणे आणि वस्तू: रशियाने जवस बियाण्यांच्या बदल्यात चीनकडून घरगुती उपकरणे आणि बांधकाम साहित्य घेतले.


धातू आणि यंत्रसामग्री: रशियन धातूंच्या बदल्यात चीनने यंत्रसामग्री दिली.

अॅल्युमिनियम आणि सेवा: काही रशियन आयातदारांनी चीनी कंपन्यांना सेवांच्या बदल्यात अॅल्युमिनियम दिले.

बार्टर वाढण्यामागे कारण काय ?

2022 मध्ये SWIFT प्रणालीतून रशियन बँकांना वगळल्याने रशियाचे आंतरराष्ट्रीय व्यवहार कठीण झाले. चीनी बँका अमेरिकेच्या दुय्यम निर्बंधांच्या भीतीने रशियाकडून पैसे स्वीकारायला कचरू लागल्या. त्यामुळे बार्टर प्रणाली अधिक लोकप्रिय झाली.

2024 मध्ये रशियाच्या अर्थ मंत्रालयाने बार्टरद्वारे व्यवहार कसे करावेत यासाठी मार्गदर्शक पुस्तिका जारी केली.

बार्टरमध्ये सहभागी देश

रशियासोबतच इराण, चीन, पाकिस्तान आणि व्हेनेझुएला हे देशही आता बार्टर प्रणाली वापरत आहेत.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या देशांमध्ये थेट वस्तुविनिमय करून व्यापार सुरू ठेवला जात आहे.

अलीकडील बार्टर डील्स (2023–2025):

1 चीन–इराण: कार पार्ट्सच्या बदल्यात इराणी कॉपर, झिंक आणि काजू.

2️ चीन–इराण: ऑटो पार्ट्सच्या बदल्यात पिस्ते.

3️ श्रीलंका–इराण: चहा निर्यातीच्या बदल्यात तेल.

4️ व्हेनेझुएला–इराण: कच्च्या तेलाच्या बदल्यात रिफायनरी साहित्य आणि कंडेन्सेट्स.

पाकिस्तानचा वाढता प्रभाव

भारताला या बदलाचा थेट फटका बसत आहे.

इराण–इस्रायल तणावामुळे भारताचा बासमती तांदळाचा व्यापार अडकल्यानंतर, पाकिस्तानने तांदळाच्या बदल्यात इराणकडून पेट्रोलियम आणि वीज घेण्याचे करार केले.

2023 मध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तान, इराण आणि रशियासोबत बार्टर व्यापारास अधिकृत परवानगी दिली.

यामुळे त्यांच्या डॉलर साठ्यावरील दबाव कमी झाला आणि तेल, गॅस यांसारख्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहिला.

बार्टर व्यापाराचे फायदे आणि धोके

बार्टर प्रणालीमुळे रशियासारखे देश निर्बंधांनंतरही अर्थव्यवस्था टिकवू शकले.

सहभागी देशांना स्वस्तात कच्चामाल, तेल आणि धातू मिळू लागले.

मात्र पश्चिमी देश या व्यवहारांवर बारीक नजर ठेवून आहेत.

अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन आणि जपानने “कॉमन हाय प्रायोरिटी लिस्ट (CHPL)” तयार केली आहे. यात रशियाला युद्धासाठी लागणाऱ्या 50 प्रमुख वस्तूंचा समावेश आहे.

चीन, भारत, यूएई आणि व्हिएतनामसारख्या देशांशी व्यवहार करताना खबरदारी घ्यावी,असा इशारा ब्रिटिश सरकारने कंपन्यांना दिला आहे

एकूणच रशिया-युक्रेन संघर्षानंतर जागतिक व्यापारात बार्टर प्रणालीचे पुनरागमन हे नव्या आर्थिक वास्तवाचे संकेत आहे.

चलन व्यवहारांवर निर्बंध येत असताना, वस्तुविनिमयावर आधारित व्यापार पुन्हा मजबूत होत आहे. पुढील काही वर्षांत हा प्रवाह कायम राहिला, तर जागतिक व्यापाराचा चेहराच बदलू शकतो.

Updated : 6 Oct 2025 9:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top