नवरात्रीत मर्सिडीज-बेंझची विक्रमी विक्री, 9 दिवसांत 2,500 वाहनांची विक्री
X
लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ इंडियाने या नवरात्रीत जबरदस्त कामगिरी केली आहे. जुलै ते सप्टेंबर (Q2 FY25-26) या तिमाहीत कंपनीने विक्रमी 5,119 युनिट्सची विक्री केली असून, फक्त नवरात्रीच्या 9 दिवसांतच तब्बल 2,500 हून अधिक कार्स विकल्या गेल्या आहेत.
36% वाढ सप्टेंबरमध्ये :
सप्टेंबर महिन्यात कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 36 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. जीएसटी 2.0 सुधारणा आणि वाढलेली ग्राहकांची मागणी यामुळे ही ऐतिहासिक विक्री झाली आहे.
जीएसटी दरकपात आणि उत्सवाच्या काळात ग्राहकांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे सप्टेंबरमधील विक्री विक्रमी ठरली. दिवाळी आणि धनत्रयोदशीसाठीही खरेदीचा हा उत्साह कायम राहील, सध्या 2,000 कार्सची प्रलंबित ऑर्डर असून, उत्सवाच्या काळात आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे.
अशी माहिती मर्सिडीज-बेंझ इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर
सर्वाधिक मागणी असलेली मॉडेल्स :
Long Wheelbase E-Class
लक्झरी SUV: GLC, GLE, GLS, G63 AMG या मॉडेल्ससाठी आतापर्यंतची सर्वाधिक विक्री झाली आहे.
इलेक्ट्रिक कार्सचा दमदार परफॉर्मन्स :
मर्सिडीज-बेंझच्या बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल (BEV) पोर्टफोलिओनेही वेग घेतला असून, एकूण विक्रीत 8% वाटा BEV सेगमेंटचा आहे.
EQS SUV ने या तिमाहीत विक्रमी विक्री नोंदवली आहे. मर्सिडीज-बेंझने भारतात आपल्या इलेक्ट्रिक वाहन विक्रीत सातत्य राखले असून, एकूण विक्रीत BEV चा वाटा 8 टक्के आहे.
कंपनीच्या मते, BEV पोर्टफोलिओमध्ये वार्षिक10 टक्के वाढ झाली असून EQS SUV साठी आतापर्यंतची सर्वोच्च विक्री नोंदली गेली आहे.