Home > Business > LG Electronics चा IPO उद्यापासून खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये GMP वाढला, गुंतवणूक करावी का ? - CA प्रियंका कुलकर्णी

LG Electronics चा IPO उद्यापासून खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये GMP वाढला, गुंतवणूक करावी का ? - CA प्रियंका कुलकर्णी

LG Electronics चा IPO उद्यापासून खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये GMP वाढला, गुंतवणूक करावी का ? - CA प्रियंका कुलकर्णी
X

या IPO बद्दलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पूर्णपणे Offer for Sale (OFS)आहे. म्हणजेच कंपनीकडून नवीन शेअर्स जारी होणार नाहीत. साउथ कोरियातील प्रमोटर कंपनी LG Electronics Inc. त्यांच्या काही शेअर्सची विक्री या IPO मधून करणार आहे. त्यामुळे या IPO मधून मिळणारे पैसे कंपनीकडे न जाता, थेट त्या प्रमोटर्सकडे जाणार आहेत.

ग्लोबल स्तरावरही LG ची पहिली तिमाही (Q1 2025) कामगिरी चांगली दिसते. कंपनीने आपला सर्वाधिक पहिला तिमाही महसूल नोंदवला आहे KRW 22.74 ट्रिलियन (कोरियन वॉन) .

विश्लेषकांच्या मते पुढच्या वर्षातही महसूलात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

बाजारात या IPO बद्दल प्रचंड चर्चा सुरू आहे, कारण ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सातत्याने वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी GMP सुमारे ₹146 होता, आणि आता तो ₹175 पर्यंत पोहोचल्याचे विविध रिपोर्ट्स सांगत आहेत.

पण, लक्षात ठेवा IPO मध्ये गुंतवणुकीचा निर्णय फक्त ग्रे मार्केट प्रीमियमवर अवलंबून घेऊ नये. कंपनीचा व्यवसाय, आर्थिक कामगिरी, उद्योगातील स्थान, आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता हे घटक अधिक महत्त्वाचे आहेत.

थोडक्यात सांगायचं तर

IPO प्रकार: - Offer for Sale (OFS) fresh issue नाही

IPO आकार: सुमारे ₹11,600 कोटी

Promoter: LG Electronics Inc. (South Korea)

GMP: ₹146–₹175 दरम्यान (अंदाजे)

IPO Date : October 7, 2025 to October 9, 2025

Lot size 13 — ₹14820

(Disclaimer: ही माहिती फक्त शैक्षणिक आणि माहितीपर हेतूसाठी आहे. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)

Updated : 6 Oct 2025 3:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top