Home > Business > 'विदेशी ते स्वदेशी' McDonald's ने आणला भारतात ‘मल्टी-मिलेट बर्गर बन’

'विदेशी ते स्वदेशी' McDonald's ने आणला भारतात ‘मल्टी-मिलेट बर्गर बन’

विदेशी ते स्वदेशी McDonalds ने आणला भारतात ‘मल्टी-मिलेट बर्गर बन’
X

जगप्रसिद्ध फास्ट-फूड ब्रँड McDonald's कंपनीने भारतात पहिल्यांदाच मल्टी-मिलेट बर्गर बन (Multi-Millet Burger Bun) लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे हा बन भारतीय संशोधन संस्थेच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे.या अनोख्या उपक्रमामध्ये McDonald's India ने CSIR- Central Food Technological Research Institute (CFTRI), मैसूर सोबत भागीदारी केली आहे. या बनमध्ये पाच प्रकारच्या मिलेट्सचा (बाजरी, नाचणी, ज्वारी, प्रोसो आणि कोडो) वापर करण्यात आला आहे.

मिलेट्स म्हणजे काय ?

मिलेट्स म्हणजे पारंपरिक भारतीय भरड धान्ये , यात ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या भरड धान्यांचा समावेश होतो.

ही धान्ये ग्लूटन-फ्री, फायबरने भरपूर आणि पौष्टिकदृष्ट्या समृद्ध असतात.तसेच या पिकांना खूप कमी पाण्याची आवश्यकता असते.

हा मल्टी-मिलेट बन CSIR अंतर्गत CFTRI ने विकसित केलेल्या फूड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी या लॉन्चची घोषणा करताना सांगितले —

“हा क्षण भारताच्या विज्ञान, नवोपक्रम आणि आहार-संस्कृतीसाठी अभिमानाचा आहे. विदेशी ब्रँड भारतीय धान्यांना जागतिक मेनूत स्थान देत आहेत, हे खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’चे यश आहे.”

काय आहे या नवीन बनमध्ये ?

या नव्या बर्गर बनमध्ये ५ प्रकारच्या मिलेट्सचा २२% मिश्रण आहे

बाजरी

नाचणी

ज्वारी

प्रोसो

कोडो

हा बन केवळ पौष्टिक आणि हलका नसून, पारंपरिक धान्यांच्या चवीला आधुनिक स्वरूप देतो.ग्राहक आता कोणत्याही बर्गरसोबत हा मल्टी-मिलेट बन फक्त ₹१० अतिरिक्त भरून निवडू शकतात. ही सुविधा McDelivery अॅप आणि सर्व McDonald's स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

“McDonald's नेहमीच भारत सरकारच्या ‘मिलेट मिशन’सारख्या उपक्रमांना पाठिंबा देत आली आहे. हा मल्टी-मिलेट बन स्वाद, पोषण आणि शेतकऱ्यांचा विकास — या तिन्हींचा सुंदर संगम आहे.”हा उपक्रम भारताच्या मिलेट मूव्हमेंटसाठी महत्त्वाचा टप्पा ठरत असून, McDonald's हे मिलेट्स आपल्या मेनूमध्ये समाविष्ट करणारे पहिले आंतरराष्ट्रीय फास्ट-फूड ब्रँड्सपैकी एक बनले आहे.यामुळे भारतीय शेतकऱ्यांना नवे बाजार मिळतील आणि देशातील पारंपरिक धान्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळेल,असे मत McDonald's India (North & East) चे चेअरमन संजय अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

Updated : 4 Nov 2025 4:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top