आपच्या २० आमदारांचे सदस्यत्व रद्द

Update: 2018-01-21 10:54 GMT

लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या वीस आमदारांचे सदस्यत्त्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रद्द केले आहे. त्यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारसाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातो आहे. निवडणूक आयोगाने कारवाई करत लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या २० आमदारांना राष्ट्रपतींनी अपात्र ठरवावे अशी शिफारस केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मान्य करत २० आमदारांना अपात्र ठरवले आहे.

ही कारवाई चुकीची असून मोदी सरकारने मुद्दामहून हे केल्याचा आरोप आधीच आपने केला होता. या सर्व कारवाईमुळे पुन्हा आप विरुध्द भाजपा हा वाद चिघळणार असल्याचे बोलले जातंय.

 

Similar News