राष्ट्रवादीचे मिशन विधानसभा, शरद पवार घेणार जिल्हानिहाय बैठका

Update: 2019-06-13 03:36 GMT

मुंबई - लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा चांगले यश मिळवल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आणून सत्ता गाठण्याचे टार्गेट राष्ट्रवादीने आपल्यापुढे ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गुरुवारपासून पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. १३, १४ आणि १५ जून रोजी हा दौरा आयॊजित करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, पालघरसह नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, पिंपरी-चिंचवड आदी शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका शरद पवार घेणार आहेत. लोकसभेला आपले काय चुकले, कोठे मते कमी पडली, काय केले पाहिजे, कोणत्या मुद्द्यावर प्रचार केला पाहिजे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकांना प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे हे नेते उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Similar News