मोदी होणार ३० मे रोजी पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान ?

Update: 2019-05-24 09:30 GMT

येत्या ३० मे रोजी पुन्हा एकदा मै नरेंद्र दामोदरदास मोदी.....शपथ लेता हूँ हा आवाज दिल्लीत घुमणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा 30 मे रोजी पार पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. लोकसभा निवडणुकीत पाशवी बहुमत मिळवत नरेंद्र मोदी आता सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होणार आहेत.

यंदाच्या निवडणूक निकालात भाजपाप्रणित एनडीएला 348 जागांवर अभुतपूर्व यश मिळालं. तर भाजपला 303 जागांवर यश मिळवता आलंय. त्यामुळं पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा मोदींचे नाव शिक्कामोर्तब झालंय. मोदींचा शपथविधी गुरुवारी 30 मे रोजी पार पडणार अशी चर्चा आहे. 2014 मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी अत्यंत भव्य समारंभ करण्यात आला होता. त्यावेळी या कार्यक्रमासाठी ‘सार्क’ मधीलच्या देशांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात आलं होतं. ज्यामध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचा देखील समावेश होता. त्यामुळे यंदा होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली असून या सोहळ्यात कोणकोण सहभागी होणार अशी चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण दिले जाते की नाही याबाबतची उत्सुकता आहे.

Similar News