ICICI बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर

Update: 2018-06-18 17:59 GMT

आईसीआईसीआई बॅंकेने संदिप बक्शी यांची सीओओ Chief Operating Officer म्हणून नियुक्ती केली आहे. ते १९ जून पासून पदाचा कार्यभार सांभाळतील. आयआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर या चौकशी होईपर्यंत रजेवर जाणार आहेत. याबाबत बॅंकेने आज पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

आयसीआयसीआय बँकेमार्फत २०१२मध्ये व्हिडिओकॉनला ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज दिले गेले होते. या प्रकरणी तसेच, या कर्जाप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्या संदिग्ध भूमिकेशी संबंधीत आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. चंदा कोचर यांची ही चौकशी होईपर्यंत त्या रजेवर जाणार आहेत.

दरम्यान चंदा कोचर यांनी ३० मे रोजी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या अर्जाला आज बोर्डाने मंजूरी दिली. दरम्यान चंदा कोचर या रजेवर गेल्या असल्या तरी त्या एमडी आणि सीईओ असणार आहेत. पण अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत सुट्टीवर राहतील असे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Similar News