सरकारी बॅंकांनी तुमच्या खिशातून कमावले १० हजार कोटी!

Update: 2018-12-22 07:56 GMT

बॅंकांनी गेल्या साडेतीन वर्षात तुमच्या खिशातून तब्बल १० हजार कोटी रुपये कमावले आहेत. आता तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही. मात्र, हे खरे आहे. तुम्ही ज्या एटीएममधून पैसे काढतात त्या एटीएमएमच्या शुल्कातून आणि बचत खात्याच्या शुल्काच्या माध्यमातून सरकारी बँकांनी गेल्या साडे तीन वर्षांत तब्बल १०,००० कोटी रुपये कमावले आहेत. अशी माहितीच स्वत: देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली आहे.

देशातील बँकांचा नफा आणि एटीएमच्या स्थितीबद्दल लोकसभेत दिव्येंदू अधिकारी यांनी

प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बॅंकांना गेल्या साडेतीन वर्षात १० हजार कोटींचा नफा झाल्याचे सांगितले.

काही दिवसांपुर्वी लागू केलेल्या नियमानुसार एका महिन्यांत एटीएममधून पाचहून अधिकवेळा पैसे काढल्यास बँका प्रत्येक वेळेस २० रुपये शुल्क आकारतात. तसंच एसबीआय वगळता इतर सर्व सरकारी बँका अपेक्षित नीच्चतम रक्कम जर बचत खात्यात नसेल तरीही खातेदारांकडून शुल्क वसूल करतात. या शुल्काच्या माध्यमातूनच सरकारी बॅंकांनी १०,००० कोटींची कमाई केली आहे. तर खासगी बॅंकानी किती पैसे कमावले असतील याचा विचार न केलेलाच बरा...

Similar News