तुकाराम मुंडेंच्या बदली मागे कोणाचा हात?

आपल्या कामाने जनतेच्या मनात घर करणारे नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आज काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये तुकाराम मुंडे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Update: 2020-08-26 13:40 GMT

आपल्या कामाने जनतेच्या मनात घर करणारे नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आज काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये तुकाराम मुंडे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या दहा वर्षातील त्यांची ही १५वी बदली असून त्यांचा आणि नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदिप जोशी यांच्यामध्ये वाद सुरु होता.

या वादामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याचं बोललं जात आहे. विशेष बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंडे सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीमागे सरकार उभं आहे असं म्हटलं होतं. मात्र, या वादानंतर तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आली.

या बदलीमागे केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्याचा हात असल्याचं बोललं जात आहे.

Full View

Similar News