सभागृहात रिमोट चालला नाही

Update: 2019-11-30 09:12 GMT

मंत्रिमंडळातील सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) करून देत असताना विरोधी पक्षातील आमदारांनी वेल मध्ये येऊन गोंधळ केला. उध्दव ठाकरे उभे राहिल्यानंतर ही गोंधळ सुरूच होता. सुरू असलेला. गोंधळ पाहत उध्दव ठाकरे हतबल होऊन पाहत होते. त्यानंतर ते गोंधळ न थांबल्याने खाली ही बसले.अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी उध्दव ठाकरे यांना पुन्हा मंत्रिमंडळाचा परिचय करून देण्यास सांगीतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाचा परिचय करून दिला.

हे ही वाचा...

महिला सुरक्षेला प्राधान्य, पण सत्तेत सहभाग कुठाय?

ठाकरे सरकार बहुमत चाचणीत पास!

अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला

मात्र मंत्रिमंडळाने घेतलेली शपथ बेकायदेशीरपणे घेतली असल्याने हा परिचय ही बेकायदेशीर असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. त्याचप्रमाणे हंगामी अध्यक्ष बदलून पुन्हा हंगामी अध्यक्ष नेमणे नियमबाह्य आणि घटनाबाह्य असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. हंगामी अध्यक्षाला बदलून हंगामी अध्यक्ष नेमून विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणं घटनाबाह्य असल्याने हा ठराव बेकायदेशीर असल्याचं फडणवीस यांनी सभागृहात म्हटलं आहे

Similar News