८ हजारात महिन्याचा खर्च निघत नाही, वर्ष कसं काढयाचं

Update: 2019-11-19 08:43 GMT

मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने राज्यात थैमान घातले होते. या पावसाने शेतकऱ्यांच प्रंचड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती.

पंरतु राज्यपालांच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार मिळणार आहेत. यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ८ हजारात आपला महिन्याचा खर्च निघत नाही, तर वर्षाचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आहे. जो जगाला पोसण्याचं काम करतो त्यालाच आपला उदरनिर्वाह करणं कठीन जातयं असं मत विश्वेशराव फिसके यांनी दिली आहे.

 

Similar News