सामना विरुद्ध तरुण भारत; सत्तेची वाटाघाटी संपादकीय लेखातुन

Update: 2019-11-04 10:40 GMT

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर सत्तास्थापनेचा खेळ सुरु झाला. भाजप आणि शिवसेना महायुतीला (BJP-Shivsena Allience) मिळालेलं यश काही पचनी पडलं नाही असं चित्र निर्माण झालं आहे. जनतेनं भक्कम विरोधक विरोधकही उभा केला पण, याचा फायदा शिवसेनेलाच अधिक झाला. महाराष्ट्राच्या महायुतीतला मोठा भाऊ राजकीय परीस्थितीचा अंदाज घेत कमीपणा घेऊन दिवस ढकलत होता. मात्र या निकालाने भाजपला आपल्या शिवाय काही जमायचं नाही याचा पक्का ताळेबंद बसल्याने थोरलेपणा पुन्हा उफाळुन आला आहे.

सुरवातीला शिवसेनेने ५०-५० फॉर्मुल्याची आठवण करुन दिली पण भाजप काही जुमानत नाही म्हटल्यावर प्रत्यक्ष भेट न घेता माध्यमांतुनच वाटाघाटीचा प्रयत्न सुरु झालाय. यादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. ‘मुख्यमंत्री आमचाच होणार’ या आपल्या भुमिकेवर शिवसेना ठाम आहे असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातुन भाजप आणि मुख्यमंत्र्यावर (Cheif Minister) टिकेची झोड उठवली आहे.

संजय राऊत यांच्या टिकांकडे कानाडोळा करणाऱ्या भाजपने आज उत्तरादाखल ‘तरुण भारत’ या वृत्तपत्राच्या संपादकीय लेखात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या लेखात त्यांची तुलना उद्धव आणि ‘बेताल’ या मथळ्याखाली विक्रम आणि वेताळाच्या कथेतील पात्रांशी केली आहे. रोखठोक मधुन संजय राऊत यांनी केलेल्या टीकांचा तरुण भारत मधील संपादकीय लेखातुन खरपुस समाचार घेण्यात आला आहे.

यावर संजय राऊत यांनी 'तरुण भारत' अशा प्रकारचे एखादे वृत्तपत्र आहे का, मला माहीत नाही. ‘मुख्यमंत्रीही वर्तमानपत्र वाचत नाहीत, ते आमचा सामनाही वाचत नाहीत’ असं सुचक प्रत्युत्तर दिले आहे. पाहा व्हिडीओ.

https://youtu.be/FzgJ5c-ftE0

Similar News