कोथरूड मतदारसंघ: मला आमदार का व्हायचंय? उमेदवार दीपक शामदिरे

Update: 2019-10-14 18:20 GMT

लोकसभेत मिळालेले मताधिक्य पाहून वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले दिसतायत. कोथरूड विधानसभा मतदार संघ 2009 पासून शिवसेना भाजपकडे आहे. भारतीय जनता पार्टी करता हा मतदारसंघ सुरक्षित मानला जातो. म्हणूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/965611200468048/?t=3

2014 साली मेधा कुलकर्णी या कोथरूड मधून भाजप पक्षाकडून आमदार राहिलेल्या आहेत. त्यांना तिकीट नाकारून चंद्रकांत पाटलांना दिल्यामुळे मतदारसंघात नाराजी नाट्य चालू होते. अनेक संघटनांकडून चंद्रकांत दादा पाटलांना विरोध करण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादीला सक्षम उमेदवार न भेटल्याने या मतदारसंघातून उभे असलेले मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दर्शविला.

कोथरुड मतदारसंघात प्रमुख लढत ही मनसे, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्ष यांच्यात आहे. मनसेकडून किशोर शिंदे, भाजपकडून चंद्रकांत पाटील, आम आदमी पक्षाकडून अभिजीत मोरे तर वंचित बहुजन आघाडीकडून दीपक शामदिरे रिंगणात आहेत.

मला आमदार का व्हायचंय? याबाबत वंचितचे उमेदवार दीपक शामदिरे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी, “ वंचित बहुजन आघाडी म्हणजेच स्वाभिमान आहे. वंचित बहुजन समाज आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या मागे राहिला असला तरी शिक्षणातून प्रगती साधण्याची धडपड चालू आहे.

कोथरूडमधील जनतेचे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरली आहे, ज्या अडचणी आज पर्यंत सुटल्या नाहीत त्या वंचित बहुजन आघाडी सोडवण्याचा प्रयत्न करेल. कोथरूड मधील जनता वंचितला अधिक मताधिक्याने निवडून देईल, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त जागा वंचित बहुजन आघाडी जिंकेल” असे सांगितले.

Similar News