सुशांत सिंहच्या थेरपिस्टने अखेर मौन सोडलं

Update: 2020-08-03 02:40 GMT

सुशांत सिंहवर (Sushant Singh Rajput) उपचार करणाऱ्या मानसोपचारज्ज्ञ सुसान वॉकर यांनी भारतीय मीडिया आणि राजकीय पुढाऱ्यांचा सुरु असलेला बावळटपणा बघून सत्य कथन केलंय. सुशांत हा मानसोपचार घेत होता, त्या मानसिक आजारामुळेच त्याने जीवन संपवलं.

निकृष्ट भारतीय मीडियाने या प्रकरणात सर्व मर्यादा ओलांडल्या आहे, असे सांगत त्यांनी आपले मौन सोडले आहे. मोजो स्टोरीला दिलेल्या निवेदनात सुसान वॉकर यांनी ही माहिती दिली आहे. सुशांत सिंह या बायपोलर डिसऑर्डर या गंभीर मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याची पार्टनर रिया चक्रवर्ती हिने त्याला या काळात मोठा आधार दिल्याची माहिती सुसान वॉकर यांनी दिली आहे.

“सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये संदर्भात सध्या प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांच्याबद्दल जी चुकीची माहिती दिली जात आहे, त्यामुळे मी खरी माहिती देणे माझे कर्तव्य समजते, असे सुसान यांनी म्हटले आहे.“

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2019मध्ये मी सुशांत सिंह आणि रियाला अनेकवेळा भेटली होती.

त्यानंतर यावर्षी सुद्धा जूनमध्ये रियाशी संपर्क झाला होता. सुशांत सिंह हा बायपोलर डिसऑर्डर या गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त झाला होता. या आजारात रुग्ण खूप अस्वस्थ होतो, प्रचंड नैराश्यात जातो किंवा आपण खूप मोठे आहोत आणि आपला कुणीतरी खूप छळ करतेय असे रुग्णाला वाटू लागते. या काळात रियाने सुशांत सिंहची खूप काळजी घेतली. तिचे सुशांतवरील प्रेम, त्याची काळजी घेणे यामुळे मी इम्प्रेस्ड झाले होते.

रियाबद्दल सोशल मीडियावर जे काही सुरु आहे. त्याचा मल्ला धक्का बसला आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर तरी आता मानसिक आजारांबाबत जागरुकता निर्माण होऊन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे येण्याची गरज आहे.” असे वॉकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Similar News