रेल्वे सुरू होणार असल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

Update: 2020-04-14 17:01 GMT

१४ एप्रिल म्हणजे आजपासून रेल्वे सुरू होणार असल्याची अफवा पासरल्यानंतर मुंबईच्या वांद्रे परिसरात आज दुपारी मोठी गर्दी उसळली. जमलेल्या लोकांना रेल्वे सुरू होणार असल्याची माहिती कोणी दिली, या अफवा कोणी पसरवल्या आणि लॉकडाऊनचं उल्लंघन करून गर्दी जमण्यासाठी कोण कारणीभूत होतं याचा शोध घेतला जाणार आहे.

या प्रकारची अफवा कोणी पसरवली त्याबद्दलचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. या अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Similar News