राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार: अजित पवार

Update: 2020-05-29 09:45 GMT

"गेल्या अडीच महिन्यापासून सर्व कामकाज ठप्प आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यावर आपल्याला मार्ग काढायचा आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. यासाठी मंत्रिमंडळात निर्णय होणार आहे. मध्यंतरी 21 लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले. पण प्रत्येक राज्यातील जनतेच्या हातात प्रत्यक्षात किती मदत येणार? याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही म्हणतात हे नुसते मोठे आकडे पाहायला मिळाले. गरीब जनतेला ही मदत मिळायला हवी, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहे."

असं म्हणत अजित पवार यांनी राज्यसरकार लवकरच राज्य सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करणार असल्याची माहिती दिली. आज औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उड्डाणपुलापैकी औंध-रावेत या उड्डाणपुलाचे आज त्यांंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी अजित पवार बोलत होते.

ग्रामीण भागात कोरोना चा प्रादुर्भाव

"केंद्राने असो, राज्याने असो की स्थानिक प्रशासनाने असो यांनी एकमेकांवर ढकलाढकली करण्यापेक्षा हे जगावरचे संकट आहे, हे लक्षात ठेऊन आपला भारत एकजुटीने याचा सामना करतोय असाच संदेश समाजात जायला हवा," "केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन त्यांच्या पातळीवर कोरोना रोखण्याचे प्रयत्न करत आहे. शहरी भागातून स्थलांतर झाल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र खबरदारी घेतली तर घाबरण्याचे कारण नाही,"

असं म्हणत अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य शासन कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती यावेळी माध्यमांना दिली.

Similar News