मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना मोठा दणका, घेतला ‘हा’ निर्णय

Update: 2019-12-05 19:07 GMT

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आलेल्या सरकारने नगर विकास विभागांच्या कामांना तातडीची स्थगीती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषद यांच्यातील मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांना स्थगिती दिली आहे.

आज 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. पालिका क्षेत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. ज्या कामाचं उद्घाटन झालेलं नाही. अशा कार्य़क्रमांना स्थगिती देण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

हे ही वाचा

पी चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल ‘हेच का अच्छे दिन’

‘डग बीगन’ झाला ‘वर्षा’

चैत्य भूमीवरील अभिवादनावरून भाजपने उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलं

उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तातडीने ज्या कामाचे कार्यादेश निघाले नाहीत. त्यांची यादी द्यावी अशा सुचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आज राज्य सरकारच्या नगर विकास विभागाचे अप्पर सचिव विवेक कुमार यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत.

सर्व कामांचा आढावा घेतल्याशिवाय नव्या कामांना मंजुरी दिली जाणार नाही. असं या आदेशात म्हटलं आहे. घाईघाईने नगर विकास विभागाकडून काही कामांना मंजुरी दिल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या आदेशामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांना मोठा झटका बसणार आहे. या आदेशाने एकूणच अधिकारी वर्गामध्ये खळबळ उडाली असून या कामांची मंजूरी मिळाली आहे त्यांचेही धाबे दणाणले आहेत.

या आदेशाचा फटका भाजपला बसणार असून राज्यात सर्वाधिक नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर हा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारने दिलेले आदेश रद्द करुन फडणवीसांना देखील शह दिला असल्याचं बोललं जात आहे.

Similar News