भाजपसोबत येण्याचा प्रस्ताव थेट शरद पवारांनी दिला: फडणवीसांचा गौप्यस्फोट

Update: 2020-06-23 12:13 GMT

आज ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राजू परुळेकर यांनी फडणवीस यांना 80 तासाच्या सरकार स्थापने संदर्भात अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला तो नक्की कोणाचा होता? अजित पवार की शरद पवार? यावर फडणवीस यांनी भाजपसोबत येण्याचा प्रस्ताव आधी थेट शरद पवार यांच्याकडून आला होता.

काय म्हणाले फडणवीस?

आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, म्हणजे अजित पवार नाही. थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. त्यावेळी योग्य त्या चर्चा झाल्या होत्या. व्हायला पाहिजे त्या सर्व चर्चा झाल्या, पण त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका बदलली. त्यानंतर दोन-तीन दिवस आम्ही शांत होतो, त्यानंतर मात्र, आम्हाला अजित पवारांकडून फिलर आला, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यांनी शरद पवारांची भूमिका मान्य नाही असं सांगितलं. तीन पक्षाचं सरकार चालू शकत नाही. भाजप-राष्ट्रवादी स्थिर सरकार देऊ शकतील म्हणून मी तयार आहे.’’

असं म्हणत फडणवीस यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी ची म्हणजेच शरद पवार यांची ऑफर होती असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.

Similar News