Max Maharashtra Exclusive: शिवसेना-राष्ट्रवादीत निवडणुकीपूर्वीच ठरलं होतं – संजय राऊत

Update: 2019-12-24 14:01 GMT

शिवसेना आणि राष्ट्रवादीत निवडणुकीआधीच सेटिंग झाली होती, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. शिवसेनेने हा आरोप फेटाळला होता. मात्र, निवडणुकी आधी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीत भाजपाचं सरकार घालवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. काय ठरलं होतं या बैठकीत, काय चर्चा झाली हे संजय राऊत यांनी 'मॅक्समहाराष्ट्र'ला दिलेल्या मुलाखतीत रात्री पाहायला मिळणार आहे.

अमित शाहांमुळेच एनडीएमध्ये अस्वस्थता – संजय राऊत

दरम्यान केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं निरीक्षणही संजय राऊत यांनी नोंदवलंय. पण त्याचबरोबर अमित शाहा २०१४मध्ये केंद्रात आले आणि त्यानंतर एनडीएमध्ये फाटाफूट होण्यास सुरूवात झाली असा आरोपही संजय राऊत यांनी या मुलाखतीत केलाय. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडलीये आणि एनडीएतील इतर घटक पक्ष हे आता केवळ पेईंग गेस्ट म्हणून आहेत, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

गोव्यात लवकरच सत्ताबदल – संजय राऊत

महाराष्ट्रानंतर आता भाजपला गोव्यातही धक्का देण्याची तयारी शिवसेनेनं केलीये आणि लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल असा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी या मुलाखतीत केलाय.

शिवसैनिकांच्या त्या कृतीचा संजय राऊतांकडून निषेध

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून मुंबईत एका व्यक्तीचं शिवसैनिकांनी मुंडन केल्याच्या घटनेवर भाष्य करताना त्यांनी अशा घटना होऊ नयेत असं म्हटलंय. तसंच राज्यात यापुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत अशा घटना घडणार नाहीत अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिलीये.

Full View

Similar News