RBI: रिझर्व बँक देणार सरकारला 1.76 लाख कोटी

Update: 2019-08-26 16:52 GMT

रिझर्व बँक ऑफ इंडीया ने आपल्याकडील अतिरिक्त 1.76 लाख कोटी रूपये सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेने आज बिमल जालान कमिटीच्या शिफारशी स्वीकारत असल्याचं जाहीर करत एक लाख 76 हजार कोटी रुपये सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे.

2018-19 च्या अतिरिक्त शिलकीतून 1 लाख 23 हजार 414 कोटी तर सुधारित ईसीएफ द्वारे संशोधित अतिरिक्त तरतूद म्हणून 52 हजार 637 कोटी रूपये सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेने अशा पद्धतीने सरकारला पैसे देण्यावरून मध्यंतरी बराच वाद झाला होता.

Similar News