शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर 50 हजार रुपये द्या – अजित नवले

Update: 2019-11-03 15:42 GMT

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये भरपाई द्यावी. अशी मागणी आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं डॉ अजित नवले यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना डॉ. नवले यांनी गेल्या 5 ते 6 महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचं सांगत काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपनामुळे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचीत राहिले असल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर केला.

मात्र यावेळी जर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात हलगर्जीपणा झाला आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला नाही. तर तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असेल असा इशारा अजित नवले यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Full View

Similar News